ताडासन

1) ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे.

2) ताडासन करण्याची पद्धत: – ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे.

3) सावधगिरी :
हात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे.

4) ताडासनाचे फायदा :
ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्यशक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्यधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Leave a Comment