नखांची काळजी

1) लिंबू :–जर तुम्हाला जास्त काही करण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही फक्त लिंबूचे स्लाईस कापून त्याने मैनीक्योर करू शकता. आपल्या नखांना २ ते ५ मिनिट गरम पाणी मध्ये टाका आणि त्यांना लिंबूने घासा. यामुळे बोटांचा काळेपणा निघून जाईल. हे केल्यानंतर आपली बोटे गरम पाण्याने धुवून क्रीम लावा.

2) लिंबू आणि मीठ : –
लिंबू घासताना आपल्या नखांवर मीठ शिंपडा आणि आणि बोटांच्या आजूबाजूला असलेली डेड स्कीन साफ करा. एक दुसरी पद्धत ही आहे की गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मीठ टाका आणि यामध्ये ५ ते ७ मिनिटे बोटे बुडवून ब्रशच्या मदतीने त्यांना स्वच्छ करा.

3) लिंबू आणि साखर : –
जेथे तुम्ही लिंबूचा वापर मैनीक्योर साठी कराल तेथेच साखरेचा वापर स्क्रबर म्हणून होईल. लिंबूच्या रसामध्ये साखर मिक्स करून त्याने स्क्रब करा.

4) लिंबू आणि ग्लिसरीन : –
जर तुमची त्वचा कोरडी आहे तर लिंबू ने मैनीक्योर करताना त्यामध्ये ४-५ थेंब ग्लिसरीन टाका. यामिश्रनामध्ये ५ मिनिट बोटे बुडवा आणि डेड स्कीन साफ करा. फक्त लिंबू वापरल्यामुळे स्कीन ड्राई होण्याची भीती असते पण ग्लिसरीनचा वापर केल्यामुळे तुमचे नखे चमकदार होतील.

5) नखं तुटत असतील , पिवळट असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियम व प्रथिनांची कमतरता आहे हे समजून आहारात बदल करावा

6) खोबरेल तेलात मध आणि मेंदीचं तेल मिसळून गरम करावं. तेल कोमट झाल्यावर त्यात नख बुडवून ठेवावी. 10 मिनिटे तरी नख तेलात असू द्यावी. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने परिणाम समोर येतील.

7) रात्री झोपण्यापूर्वी कोमट ऑलिव्ह ऑइल नखांवर चोळावं. हलक्या हाताने मसाज करून हातमोजे घालावे. याने नखांचे सौंदर्य वाढेल.

8) दररोजच्या कामात नख रसायन, अपायकार घटकांच्या संपर्कात येत असतात. म्हणून त्यांना ओलावा हवा. नख शुष्क नको. शुष्क नख झाल्यावर त्यांना कोमट पाण्यात बुडवून ठेवावी आणि नंतर मॉईश्चरायझर लावावं.

9) लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळून मिश्रण तयार करा. याने नखांवर मसाज केल्याने नखांचं सौंदर्य वाढतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *