मूळव्याध (पाइल्स) वर उपाय

1) पोटात घ्यावयाचे औषध: १/२ चमचा आल्याचा रस, १/२ लिंबाचा रस, एक चमचा मध आणि १/२ चमचा पुदिन्याची पाने एकत्र मिसळून घ्यावीत.

2) सुके अंजीर भिजत घालून, त्यात थोडेसे दूध घालून त्याचा लेप तयार करावा. तो लेप मुळव्याधीच्या जागी लेपल्याने तेथील त्रास कमी होतो.

3) वाटलेला पांढरा मुळा आणि मध यांच्या मिश्रणाचे नियमित सेवनाने फरक वाटू लागतो.

4) सुक्या आणि वाहत्या मुळव्याधींसाठी कांदा हे नामी औषध आहे.

5) कांद्याची साले काढून ती भाजावीत आणि वाटून त्यांचा लेप लावावा उत्तम फायदा करुन देतो.

6) कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे. त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.

7) संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्ज् व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा.

8) बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल, तेथे बर्फाचा तुकडा ठेवा, याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.

9) एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो. याचे जेल, जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.

10) लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल, पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो. सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.

11) जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत. यात एंटीऑक्सींडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे. याने आराम मिळेल.

12) इतर प्राकृतिक उपाय: बर्या च वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे. व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच डॉक्टरांना सल्ला घ्यावा.

Leave a Comment