रस्त्यावरचे अपघात | Road accident First aid treatment in Marathi

पूर्वसूचनेशिवाय घडलेली घातक घटना म्हणजे अपघात होय. रस्तावरच्या अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. अपघातांमधून वाचलेल्या व्यक्तींमध्ये जखमांचे अल्पकालीन किंवा दिर्घकालीन परिणाम राहतात. उदा. अपघातामध्ये हात-पाय, डोळे जाणे, स्नायू आखडून व्यंग तयार होणे, भाजलेल्या व्यक्तीची त्वचा खराब होणे इत्यादी. रस्त्यावरचा अपघात हा एक गंभीर व गुंतागुंतीचा विषय आहे.

प्रथमोपचार :

– अपघात झालेल्या व्यक्तीस बाजूला काढा. उदा. अंगावर काही अवजड वस्तु पडलेली असल्यास ती बाजूला काढा.

– रक्तस्त्राव होत असेल तर तो थांबवा. शक्य असेल तर जखमा स्वच्छ करून फडक्याने बांघून घ्या.

– व्यक्तीची श्वसनक्रिया व नाडीचे ठोके तपासून घ्या जर या क्रिया बंद असल्यास कृत्रीम उपयांनी चालू करण्याचा प्रयत्न करा.

– जखमी व्यक्तीस हालवताना योग्य ती काळजी घ्यावी. तीन चार व्यक्तींची मदत घ्यावी.

– एक चादर व दोन बांबू वापरून स्ट्रेचर बनविता येऊ शकते.

– अपघात झालेल्या व्यक्तीस शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचविण्याची व्यवस्था करावी.

Leave a Comment