तूर | Toor Benefits In Marathi

– तूरीच्या आमटीत तूप घालून खाल्याने ती वातुळ बनत नाही.

– तुरीची डाळ त्रिदोषहारक असल्याने साधारणतः ती सर्वांना अनुकूल असते.

– तूर तुरट, रूक्ष, मधुर, शीतल, पचण्यास हलकी, शौच रोखणारी, वायू उत्पन्न करणारी, शरीराची कांती सतेज बनविणारी तसेच पित्त, कफ व रक्तदोष दूर करणारी आहे.

– लाल टरफलाची तूर डाळ शौच रोखणारी, हलकी, तीक्ष्ण व उष्ण असते. ती अग्निप्रदीपक, कफ, विष, रक्तविकार, कंड, कोड व कृमी दूर करणारी असते.

– तुरीची डाळ आरोग्यदायी व कृमी आणि त्रिदोष नाहीशी करणारी असते.

– तुरीची डाळ अर्श, ताप व गोळा उठणे या विकारांत गुणकारी असते.

Leave a Comment