उन्हाळ्यात कोणती फळे खाल्ली पाहिजेत | 10 Best Summer Foods in Marathi

मित्रानो तुम्हाला जाणवत असेलच उन्हाळा खूप वेगाने वाढत आहे. आणि म्हणूनच ह्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर अश्या काही गोष्टी खाल्या पाहीजेत जे आपल्या तना मना ला गारव्याचा अनुभव देतील. उन्हाळ्यात मिळणारी फळे प्रत्येकाने खाल्लीच पाहिजेत कारण यात खूप पौष्टिक तत्व असतात. ह्या फळांच्या सेवनाने शरीराला लागणारी पोषक तत्वे मिळतात त्याच बरोबर उन्हाच्या त्रासामुळे होणारया आजारांपासून तुमचा बचाव देखील करतात.

उन्हाळ्यात आपल्या फ्रीज मध्ये एक असा फळ जरूर ठेवा ज्यामध्ये खूप जास्त पाणी असेल उदा. टरबूज किंव्हा कलिंगड. कारण जर आपण कुठून बाहेरून घरी आला असाल तर हि फळे कापून खाल्याने आपल्या शरीराला थंडावा जाणवेल. तर मग चला पाहूया आणखी काही अशी फळे जी उन्हाळ्यामध्ये जास्त करून खाल्ली जातात.

१) कलिंगड

कलिंगड मध्ये अधिक प्रमाणात पाणी असते जो आपल्याला उन्हाळ्यात हाइड्रेट ठेवतो म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतो ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. कलिंगड खाल्याने आपली त्वचा सूर्यकिरण व उन्हामुळे होणार्या नुकसानापासून देखील वाचते. कलिंगडामध्ये साधारण पणे ९५% पाणी असते म्हणून कालीगंड उन्हाळ्यात जास्तीत जास्त खावा.

२) संत्री

उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. संत्री खाल्याने हि पोटॅशियम कमतरता भरून निघते. त्यामुळे त्वरित आरामासाठी संत्र्याचे सेवन करावे.

३) द्राक्ष

अनेक पोषक तत्वांनी संपूर्ण असलेली द्राक्ष खाल्यान्ने, आपली तहान व भूक दोन्ही मिटवल्या जाऊ शकतात.

४) अननस

उन्हाळ्यात अननस खाल्याने शरीरातील fats आणि प्रोटीन्स सहज पणे पचले जाते. तसेच शरीरातील गर्मिला नियंत्रित ठेवण्यास देखील अननस मदत करतो.

५) आंबा

आंबा हा फळांचा राजा असून त्यामध्ये खूप प्रमाणत आयन असते. आणि आंबे हे खास करून फक्त उन्हाळ्यातच उपलब्ध असतात तसेच आंबे सगळ्यांनाच आवडत असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात उन्हाळ्यात खाल्ले जाते.

६) स्ट्रॉबेरी

बऱ्याचदा उन्हाळ्यात आपल्याला लघवीला त्रास जाणवतो, जे कडक उन्हाच्या प्रभावामुळे होते. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हा त्रास कमी होण्यास खूप मदत होते.

७) लिंबू

घरामध्ये नेहमी उपलब्ध असलेले फळ म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये खुप प्रमाणत विटामिन्स असतात त्यामुळे हे पाणी व साखरेच्या मिश्रणात मिसळवून त्यात थोडे मीठ टाकून प्यावे. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल तसेच आपल्याला उर्जा मिळेल .

८) पेरू

पेरू हे सोडीयम आणि fats फ्री असतात. तसेच यात विटामिन्स C जास्त प्रमाणत उपलब्ध असतात जे आपल्याला खोकला, ताप, जुलाब यांसारख्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

९) खरबूज

उन्हाळ्यात अगदी सहज आणि स्वस्त मिळणारे फळ म्हणजे खरबूज जे पाण्याने समृद्ध आणि गोड असते. नेहमी गोड वास येणारा खरबूज खरेदी करून खावा.

१०) नारळपाणी

जर आपल्याला भूक किंव्हा तहान लागली असेल तर आपण याचे सेवन करू शकता. त्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स व इलेक्ट्रोलाईट असतात जे आपल्या शरीलाला हाइड्रेट ठेवतात.

तर मग हि काही फळे आहेत जी उन्हाळ्यात सहज पणे बाजारात मिळतात आणि जी खाल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि आपण तंदुरुस्त राहतो. मग आजच घेऊन या यातील काही फळे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment