जीवनसत्वे | All vitamins information in Marathi

1. व्हिटॅमिन ए:-
व्हिटॅमिन ए मिळण्याचे मुख्य स्त्रोत म्हणचे लाल आणि केशरी रंगाची फळे आणि भाज्या होय .

जसे पपई ,लाल मुळे ,टोमॅटो,पालक ,कैरी ,बीट ,सोयाबीन याचे अवश्य सेवन करावे .

खरखरीत त्वचा ,खराब केस व नखे यांचे कारण आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ए ची कमतरता .

2. व्हिटॅमिन बी :-

व्हिटॅमिन बी शरीराला मिळण्यासाठी सर्व पालेभाज्या ,गहू , जव ,केळी ,काजू सेवन करावे .

व्हिटॅमिन बी च्या अभावमुळे तोंडावर मुरूम ,काळे डाग येणे ,केस पांढरे होणे या समस्या उद्भवतात .

3. व्हिटॅमिन सी :-

व्हिटॅमिन सीला एसकोरबिक ऐसिड म्हणतात .

व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे दात दुखतात ,दात सुजतात ,दातांन मधून घन येणे तसेच दात कमकुवत होणे अश्या समस्या सुरु होतात .
नारिंगी फळे किंवा लिंबूवर्गीय फळे, खरबूज व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत. शरीरातील पेशींना धरून ठेवते .

4. व्हिटॅमिन डी :-
व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत बनवते तसेच हिवाळात ऋतू संक्रमणापासून संरक्षण होते.

व्हिटॅमिन डी 2 या अर्गोकेलसीफेरोल तसेच विटामिन डी 3 या कोलेकेलसीफेरोल म्हणतात .

व्हिटॅमिन डी मुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रित होते .

व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला अंड्यामधील पिवळा भाग खाल्याने ,व्हिटॅमिन डी युक्त दुध घेतल्याने तसेच मास्यांचे तेल वापरल्याने आणि कोवळे ऊनात शेकल्याने मिळते .

व्हिटॅमिन डी अधिक प्रमाणात घेतल्याने चक्कर येणे ,अशक्तपणा येणे ,डोके दुखणे , कोलेसटेरोलचे प्रमाण वाढणे आणि रक्तदाब अश्या समस्या निर्माण होतात
काळच्या कोवळ्या उन्हात अर्धा ते एक तास बसल्यास व्हिटॅमिन डी शरीराला जरुरते एवढे मिळते .

5. व्हिटॅमिन ई :-

व्हिटॅमिन ई हे लाल रक्त पेशी किंवा लाल रक्तपेशींची आर.सी.सी. (लाल रक्तपेशींची) तयार करण्यासाठी वापरला जातो.

व्हिटॅमिन ई हे आपल्या शरीराला वनस्पती तेलामधून मिळते .हे जीवनसत्व शरीरातील अनेक अवयव, स्नायू, इतर मेदयुक्त राखण्यासाठी मदत करते.

Leave a Comment