आंबेहळद | Ambehalad Benefits In Marathi

1) आंबेहळद हा प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.

2) आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

3) कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

4) शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

5) अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

6) चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहर्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

Leave a Comment