अंजीर | Anjeer (Fig) Eating Benefits In Marathi

– अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुराणातील ग्रंथात तसेच बायबलमध्ये येतो.

– उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो.

– उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी. बऱ्याच प्रमाणात मिळते.

– तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात.

– अंजीरच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

– अपचन, ऍसिडीटी, तसेच गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा अंजीरचा रस प्यावा. आराम मिळेल.

– अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते.

– लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात.

– अशक्त व्यक्तींनी अंजीराचे रस अथवा अंजीर खाल्याने गुणकारी परिणाम होतात.

– त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.

– दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

– अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो.

– त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात.

– अंजीर शक्तीवर्धक आहे.

– ओली किंवा सुकी दोन्ही प्रकारची अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणी प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

Leave a Comment