अर्धमत्स्येन्द्रासन

1) अर्धमत्स्येंद्रासन गोरक्षनाथांचे गुरू मच्छिंद्रनाथांनी शोधून काढले. मच्छिंद्रनाथ याच आसनात ध्यानस्थ बसत. मत्स्येंद्रासनातूनच अर्धमंत्स्येंद्रासनाची निर्मिती झाली.

2) खाली बसून दोन्ही पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यात वाकवून टाच पार्श्वभागाच्या खाली न्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उभा करा आणि डावा पाय मांड्यापासून वर नेऊन मांड्यांच्या मागे जमिनीवर टेकवा. आता डावा पायाला उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन अर्थात गुडघ्याच्या बाजूलाच ठेवून डाव्या पायाने उजव्या पायाचा अंगठा पकडा.

3) आता उजवा हात पाठीच्या मागे नेऊन तो फिरवावा आणि डाव्या पायाची पोटरी पकडावी. यावेळी तुमचे डोके असे फिरवा की हनुवटी व डावा खांदा एका सरळ रेषेत आले पाहिजे. खाली झुकायला नको. छाती ताणलेली हवी.

4) हेच आसन विरूद्ध दिशेनेही करता येते. सुरवातीला किमान पाच सेकंद हे आसन करा. त्यानंतर एक मिनिटापर्यंत ते वाढवत न्या.
5) पाठीचे हाड दुखत असल्यास वा पोटाचा गंभीर आजार असल्यास हे आसन करू नका.

6) अर्धमत्स्येंद्रासनामळे पाठीचा कणा चांगला रहातो. पाठीच्या हाडाबरोबरच तिथल्या नसांनाही चांगला व्यायाम मिळतो. पाठ, पोटाचे नळ, पाय, मान, हात, कंबर, बेंबीचा खालचा भाग व छाती या भागात चांगलाच ताण बसल्याने या भागातील नसातून रक्ताभिसरण सुधारते. भूक सुधारते. कंबर, पाठ व सांधेदुखी या आसनामुळे दूर होते.

Leave a Comment