अश्वगंधा | Ashwagandha Benefits In Marathi

1) हे झाड अर्धा ते एक मीटर उंचीचे, सदैव हिरवेगार असते.

2) पावसाळी, दमट वातावरणात व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते. पावसाळ्यामध्ये बियांपासून लागवड करावी. साधारणतः 15-20 दिवसांनी बी उगवते. लागवडीनंतर 18 महिन्यांनी अश्वगंधाचे मूळ व्यवस्थित तयार होते. झाडाची पाने पिकू लागली व फळे तांबडी झाली, की मुळ्या काढल्या जातात.
उपयोग –

1) अश्वगंधाचे मूळ वातरोगांमध्ये, तसेच शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असते.

2) शुक्राणू कमी असणे, सांधेदुखी, अशक्तता, मांसक्षय, रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

3) वजन वाढण्यासाठी, विशेषतः मांसधातूचे पोषण होण्यासाठी अश्वगंधा मुळाचे चूर्ण तूप-साखरेसह किंवा लोणी-साखरेसह घेता येते.

4) अश्वगंधा क्षीरपाक म्हणजे अश्वगंधा, दूध वा पाणी एकत्र उकळवून तयार केलेले सिद्ध दूधसुद्धा मांसधातू, शुक्रधातूच्या पोषणासाठी उत्तम असते.

Leave a Comment