आवळा | Awla (Amla) Eating Benefits In Marathi

– आवळा हे फळ बहुगुणी आहे.

– आवळा हे मुख्यतः पित्तशामक आहे.

– आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते.

– पित्तामुळे येणारी भोवळ आवळ्यामुळे कमी होते.

– लघवीच्या विकारांवर आवळा खूप परिणामकारक औषध आहे.

– आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात.

– आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते.

– याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी.

– आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे.

– रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे.

– रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते.

– आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

Leave a Comment