आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती -( Ayurvedic Health Tips)

आयुर्वेदिक आरोग्य टिप्स : – आयुर्वेदाचा हा आजपासून नाही तर प्राचीन काळापासून निरंतर वापर केला जात आहे, आयुर्वेद हा तेंव्हा पण मानवी आरोग्यासाठी उपयोगी होता आणि आजच्या आधुनिक काळातही आयुर्वेदाचा वापर केला जातो, आयुर्वेदाचा उपयोग केवळ आपल्या शरीरावरील त्वचे साठी नाही तर अंतर्गत शरीरात उपचार करण्यासाठी वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांचा वापर केवळ भारतातच नव्हे तर विदेशामध्ये ही केला जातो. कारण आयुर्वेदात अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती असते.

आजच्या प्रगतशील युगात आधुनिक जीवन शैली ही पुरुषांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडत आहे, यामुळे पुरुषांना आपल्या आरोग्या संबंधी आधीच सावध व्हायला पाहिजे. याच्या आधी त्यांची आधुनिक जीवन पद्धती तसेच खान्यापिण्याच्या सवई मुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. जर तुम्ही आताच तुमच्या आरोग्य संबंधी जागरूक नाही झालात तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल

पुरुषांसाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्स  

जंक फूड च्या सततच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, जर जंक फूड आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असेल तर आपल्याला हे खाण्याचे लवकरात लवकर कमी केले पाहिजे. आपल्याला आपल्या खाण्यामध्ये २ केळी जरूर खायला हवीत, केळी खाल्याने आपली दिवसभराची ऊर्जा कायम राहील आणि हृदयाच्या अनेक आजारा पासून आपल्याला दूर ठेवेल. जर आपण पॅक फूड नेहमी खात असाल तर हि सवय आपल्याला बदलली पाहिजे.

व्यायाम किंवा चालण्याचा व्यायाम केल्या शिवाय आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाही. जर आपल्याला तंदुरुस्त रहायचे असेल तर नियमित व्यायाम करा. तसेच चालण्याचा व्यायाम करा. सोडायुक्त कोल्ड ड्रिंक, कॉफी, लाल मासं, तेलकट पदार्थ यांचे सेवन कमी करा व कधी कधीच सेवन करा, कारण यांच्या नियमित सेवनाने आपल्याला नुकसानच होईल. जेवना मध्ये चांगल्या तेलाचा वापर करावा. अश्या पदार्थाचे नियमित सेवनाने आपले वजन वाढेल आणि वाढलेले वजन पुरुषांच्या योन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव होतो. म्हणून जास्त वजन वाढून देऊ नका, जर व्यायाम शाळेत जायला आपल्याकडे वेळ नसेल तर घरी व्यायाम करा, लिफ्ट चा वापर टाळा, नियमित चालण्याचा वापर करा. ऑफिस, बाजारात चालत जाणे शक्य असेल तर चालत जा किंवा सायकलचा वापर करा. आहारात ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा, यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. सकाळी नाश्ता जरूर करा, रात्रीचा आहार कमी व हलका करावा, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करावा.

सलाड व अंकुरित कडधान्यांचा वापर जेवणात करावा, जेवणात चपाती व भात एकाच वेळी खाऊ नये.

आयुर्वेदिक टिप्स

अनेक असे आयुर्वेदिक औषध आहेत ज्यामुळे आपण आपले आरोग्य सुधारू शकतो तसेच आपले शरीर मजबूत करू शकतो. आयुर्वेद हा खूप सोपा व कमी खर्चिक उपाय आहे. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत यामुळे केवळ आपले शरीर तंदुरुस्त होत नाही तर आपले मन देखील शांत रहाते. अंघोळीच्या आधी तेल मालिश केल्याने डीमेंशिया च्या उपचाराचा महत्वपूर्ण मदत होते, एनिमा सारखे अन्यकर्म शरीराला आतून स्वच्छ करणाऱ्या प्रक्रियेला मदत करते. अनेक आयुर्वेदिक संस्था ब्राम्हणी, अश्वगंधा, इतर मुख्य आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून शांतीदायक औषध व डीमेंशिया च्या उपचार साठी औषध विकसित करत आहेत. भृंगराज चा आयुर्वेदात खूप महत्व आहे कारण याने आपले केस सुंदर व घनदाट बनतात भृंगराज तेलाचा वापर करून केसांची मालिश करा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

Leave a Comment