मुलांच्या विकासासाठी काय अपेक्षा आहे ?
१) मुलांना पुरेसा पौष्टिक आहार दया. पण त्यांना अन्न खाण्यासाठी दुराग्रह करू नका. बळजबरी केली तर अन्नाचा परिणाम होणार नाही.
२) रोगप्रतिबंधक लस मुलांना टोचून घेण्याची खबरदारी घ्या.
३) मुलांना मार्गदर्शन कर. शिकवत राहा, त्यांना प्रेम, माया दया. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढा. त्यांना उगीचच सतत आपल्या संरक्षणाखाली ठेवू नका. त्यांना मोकळेपणाने खेळू बागडू दया.
४) तीन ते पाच वर्षापर्यंत दुसरे मुल होऊ देऊ नका आणि दुसऱ्या मुलाच्या आगमनाच्या वेळी पहिल्याच्या मनाची तयारी करून ठेवा.
५) मुलांना शाळेची गोडी लावा.
६) अपघात आणि विषबाधा होऊ न देण्यासाठी काळजी घ्या.
७) सुखी कुटुंबासाठी आदर्श माता हवीच. आई ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. कुटुंबाचे स्वास्थ, सुख, आरोग्य आईबरोबरच अवलंबून असते. आजचे मूल उदयाची आई किंवा पिता होणार असते. त्यासाठी, मुलाच्या प्रगतीत आपला फार मोलाचा वाटा आहे.