वॅक्सिंग करताना ही काळजी जरूर घ्या

1) शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग , वॅक्सिंग किंवा हेअर रिमुव्हल वापरावे लागते . वॅक्सिंग हा प्रकार महिलामध्ये लोकप्रिय आहे. काही महिला पूर्ण शरीराचे वॅक्सिंग करून घेतात .

2) हॉट वॅक्सिंग , शुगर वॅक्सिंग व कोल्ड वॅक्सिंग हे केस काढण्यासाठी वापरले जातात . बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊनच अनावश्यक केस काढून घेतात . त्यामुळे शास्त्रशुध्द व वेदनारहित केस काढले जातात . स्विमिंग करणाऱ्या , आखूड स्कर्ट इ. घालणाऱ्या स्त्रियांना वॅक्सिंग जास्त जरुरी वाटते .

3) पाळीच्या तीन दिवसांत वॅक्सिंग करू नये . कारण तेव्हा त्वचा नाजूक झालेली असते . त्यामुळे वॅक्सिंग दु:खदायी होऊ शकते .

4) ज्या त्वचेवर सनबर्न असतील , काही Rashes वगैरे असतील तर वॅक्सिंग करू नये . जोपर्यंत त्वचा नेहमीसारखी साफ मृदू होणार नाही तोपर्यंत वॅक्सिंग टाळावे . नंतर बर्फाने शेकावे . वेदना होणार नाहीत . कधी कधी वेदनाशामक फवारे वापरून नंतर वॅक्सिंग केले जाते . त्यामुळे वॅक्सिंग वेदनारहित होऊ शकते . वॅक्सिंग करण्याआधी थोडी बेबी पावडर लावल्यास त्वचा सुकून वॅक्सिंग च्या पट्ट्या लावणे सोपे जाते .

5) घरच्या घरी वॅक्सिंग करत असल्यास बॉडी स्क्रबिंग करून मगच वॅक्सिंग करावे . कोणत्याही प्रकारचे जंतूसंसर्ग होऊ नये याकरिता वॅक्सिंग करण्याची सर्व उपकरणे निर्जंतुक करून मगच वापरावी . वॅक्सिंग झाल्यानंतर ओल्या फडक्याने हात व पाय पुसून वीच Hajal चा स्प्रे मारवा . यामुळे त्वचेवर पुरळ येणार नाही . कारण हा स्प्रे जंतूनाशक आहे .

Leave a Comment