Beauty Face Mask बनवण्याचे घरगुती उपाय

आजकालच्या काळात सुंदर दिसणे हा जवळ जवळ प्रत्येक मुलीला छंदच जडला आहे, आणि जास्तीच जास्त सुंदर दिसण्यासाठी त्या वेगवेगळे उपाय देखिल करतात, सुंदरता वाढवण्या साठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करतात, यांचा वापर करून आपण काही काळासाठी सुंदर दिसतो पण काही काळानंतर आपण पहिल्यासारखेच दिसतो, आणि या केमिकल युक्त उत्पादना मुले काहीवेळा आपल्या त्वचेला नुकसान होऊ शकते. हे केमिकल युक्त उत्पादन आपण दररोज वापरत असल्यामुळे आपल्याला त्यांचे दुष्परिणाम जाणवत नाहीत, पण काही काळानंतर आपल्याला याचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर जाणवतात, या आपण जाणून घेऊया Beauty Face Mask बनवायचे घरचे उपाय.

आजच्या घडीला प्रत्येकाला वाटते आपण इतरांपेक्षा सुंदर दिसावे, काही लोक तर इतरांपेक्षा सुंदर दिसण्याला आपली खुबी मानतात, काही लोक हे नैसर्गिकरीत्या खूप सुंदर असतात, पण बरेच लोक आपली सुंदरता वाढवण्यासाठी Beauty Parlor मध्ये Beauty Face Mask साठी बरेच पैसे खर्च करतात, Parlor मध्ये केलेले उपाय हे ठराविक काळासाठीच असतात, म्हणून आपण आज यावरील घरगुती उपाय जाणून घेऊयात यामुळे आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाहीत, आणि आपल्या सुंदरतेत वाढ होण्यास मदत होईल.

१.  त्वचा चमकदार दिसण्यासाठी – Beauty Face Mask

सर्वप्रथम, टोमॅटो, सफरचंद, पपई, स्ट्राबेरी, काकडी घ्या आणि हे सर्व एकत्र करून त्याची बारीक पेस्ट   बनवा, आणि या पेस्ट मध्ये एक चमचा चंदन, एक चमचा दही, एक चमचा लिंबाचा रस मिळवा. मग हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा ३० मिनिटा नंतर आपला चेहरा पाण्याने धुऊन घ्या यामुळे आपल्या चेहऱ्यावर Glow (चमक) येईल

२. त्वचा मुलायम व गोरी बनवण्यासाठीसाठीBeauty Face Mask

एक वाटी घ्या आणि त्यात कणीक, 1 चमचा मध, 1 चमचा मलई मिक्स करून मळून घ्या आणि त्याचा जाड लेप तयार करून घ्या आणि 30 मिनिटांपर्यंत हा लेप आपल्या चेहर्या वर लाऊन ठेवा, हा लेप सुकल्या नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या असे केल्याने आपली त्वचा मुलायम होईल.

३. रुक्ष त्वचा आणि सावळेपणा दूर करण्यासाठीBeauty Face Mask

याचा उपयोग मुख्यतः डोळ्याच्या खालच्या त्वचेवर वापर केला जातो, सर्व प्रथम, आपण 1 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा मध, 1 चमचा तिळाचा तेल घेऊन एक लेप तयार करून घ्या हा लेप शुष्क त्वचेवर लावा यामुळे त्वचेतील शुष्कपना दूर होईल व काळसरपणा कमी होण्यास मदत होईल.

४. आपला चेहरा जास्त काळासाठी सुंदर व चमकदार ठेवण्यासाठी

एक चमचा दही, ५-६ थेंब संत्राचा रस, ३ चमचे मुलतानी माती, २ ते ३ चमचे टोम्याटोचा रस हे सर्व वाटीमध्ये मिक्स करून त्याचा लेप करून चेहऱ्यावर २५ – ३० मिनीटासाठी लाउन ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या, असे आपण एक महिन्या पर्यंत करा ज्यामुळे आपला चेहरा जास्त काळासाठी सुंदर व चमकदार दिसेल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment