स्तनपानाचे लाभ

१) आईच्या दुधात नवजात शिशुसाठी आवश्यक ती सर्व पोषणमुल्ये असतात.

२) जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईच्या दूधातील घटक बाळाचे संरक्षण करते.

३) अंगावरचे दुध पाजल्याने बाळाला विकार उद्‌भवत नाहीत व त्याचे आरोग्य उत्तम राहते.

४) महिलांच्या आरोग्यासाठी हे चांगले असल्याचे समोर आले आहे. स्तनाचा कर्करोग, वजनवाढ रोखण्यासाठीही ते आवश्यक आहे.

५) चीकाच्या दूधात जीवनसत्व ए व के जास्त प्रमाणात आढळते. त्यात असलेली रोग प्रतिबंधात्मक द्रव्ये व इतर आवश्यक घटकांमुळे जंतूसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते. तसेच या दूधात इम्युनोग्लोबीन असतात.

६) बाळाच्या आतड्यांच्या अंत:त्वचेला लिंपण होते व त्यामूळे बाळाच्या रक्ताभिसरणात प्रथिनांचे मोठे कण जात नाही. अशा प्रकारे बाळाला रोगांपासून संरक्षण मिळते.

७) प्रसूतीनंतरचे सुरवातीचे थोडे दिवस घट्ट स्वरूपातील चीकाचे दूध (कोलोस्ट्रम) येत असते. चीक-दूध कमी येत असले, तरी बाळाला ते पुरेसे असते व त्यातूनच बाळाच्या सर्व गरजा भागविल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *