बोर | Ber ( Jujube Fruit) Benefits In Marathi

1) बोराच्या फळात व्हिटॅमिन “अ’ आहे.
2) बोराची पानं चावली आणि नंतर एखादा कडू पदार्थ खाल्ला तर त्याचा कडूपणा जाणवत नाही.

3) फळाचे सरबत खोकल्यावर उत्तम उपाय आहे.
4) बोराचा गर, कथल्या गोंद, साखर, गुलाब पाकळ्या एकत्र करून त्याच्या केलेल्या गोळ्या खोकला झाल्यास देतात.

5) बोराच्या मुळापासून आणि सालीपासून टॉनिक तयार करतात; पण त्याने कफ होऊ शकतो.
6) पानं चावून खाल्ल्यास पोटाचा घेर (ओबेसिटी) कमी होतो.

7) जखमेवर पानांचा रस चोळल्यास जखम भरून येते.
8) बियांची पावडर हृदयासाठी आणि मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे.

9) मुळांचा काढा तापात देतात.
10) उन्हाळे लागल्यास बोरीच्या कोवळ्या डिऱ्या व जिरे एकत्र करून घेतात.

11) रक्तातिसार झाल्यास बोराची साल दुधात उगाळून ते मिश्रण मधातून घेतात.
12) पानांच्या लेपाने ज्वर नाहीसा होतो.

13) फळाच्या घरातून अंजन तयार करतात. त्याने नेत्ररोग बरे होतात.
14) देवी आल्यावर बोरीच्या पानांचा रस म्हशीच्या दुधातून दिल्यास देवीचा त्रास कमी होतो.

15) कंठसर्प झाल्यास रानबोरीची साल उगाळून एक-दोन वेळा पिण्यास द्यावी.
16) ओकारी होत असेल तर बोरीच्या बियांतील मगज, साळीच्या लाह्या, वडाचे अंकूर आणि ज्येष्ठमध यांचा काढा मध व साखर घालून घेतात.

17) बोराला बदरिका, बेर, बोरडी, बेरी, बोयेडी, इपानजी, अजाप्रिया, कोळी, कुवळी, बादरी, द्रिधाबिज, इंडियन प्लम, चायनीज खजूर अशी अनेक नावे आहेत.
वनस्पतीशास्त्रात त्याला “झिझिपस जुजुबा’ असे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *