फेसमास्क

1) मॉइश्चरायझिंग मास्क :- हा कोरडया त्वचेसाठी उपयोगी असतो . त्वचेचा ओलसरपणा वाढतो . यामुळे त्वचेवरील डाग , खवले नष्ट होतात . त्वचेवर हा मास्क लावून पाच ते दहा मिनिटे ठेवावा . आकसल्याप्रमाणे वाटले की धुऊन टाकावा . मड मास्क (माती बेस असलेले) हे तेलकट त्वचेचे अतिरिक्त तेल व घाण शोषून घेतात . कोमट पाण्याने चेहरा धुऊन टिपावा . मळ , मृत पेशी निघून जातात .

२) एकफोलिएटिंग मास्क :- या मास्कमुळे त्वचा तजेलदार , निरोगी राहते . काळे डाग , त्वचेचा निस्तेजपणा या मास्कमुळे जातो . खरबरीत भाग या मास्कमध्ये असतो म्हणून डेड स्कीन निघून जाऊन त्वचा निरोगी बनते .

३) पिल-ऑफ मास्क :- या मास्कमध्ये मऊ , मुलायम जेल असते . सर्व प्रकारच्या त्वचेला हा उपयुक्त ठरतो . कारण तेलकट त्वचेची रंध्रे स्वच्छ होतात व कोरडया त्वचेला पोषण मिळून त्वचा मुलायम होते . जेल सुकला की सुटून येतो .

4) चेहऱ्याला सुंदर बनविण्यासाठी Face Packs फार मोठे योगदान देतात खास करून घरी बनविलेले Face Packs.-

1) बेसन- हळदी पॅक: एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल.

2) पपई- मध पॅक: मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्यावर लावा. 15-20 मिनिटाने धुऊन टाका.

3) कोरफड पॅक: कोरफडीच्या गरात अर्धा चमचा तांदळाचं पीठ मिसळा. चेहर्यावर लावून 15 मिनिट राहू द्या. याने काळे डाग दूर होता. ऑइली त्वचेसाठी हा फायद्याचा ठरेल.
4) एवाकाडो फेस पैक –
एवाकोडोला बारीक वाटून त्यामध्ये ऑलिव ऑईल मिक्स करा. या फेस पैकला ओल्या चेहऱ्यावर लावा. १० मिनिटा नंतर चेहरा धुवून टाका.

5) मध आणि दुध
पैक बनविण्यासाठी दुध आणि मध एकत्र करा आणि फक्त ५ मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्या नंतर थंड पाण्याने धुवून टाका.

6) अंड्याच सफेद भाग
आपल्या चेहऱ्यावर अंड्याच्या सफेद भागाणे मसाज करा. २५ मिनिट तसेच ठेवा नंतर थंड पाण्यने चेहरा धुवून घ्या. ह्याने चेहरा कोमल आणि टाईट होईल.

7) केळा पैक
केळ चेहरा टाईट करते आणि त्वचे मध्ये पोषण भरते. थंडी मध्ये केळ मेश करून त्यामध्ये मध आणि दही मिसळा.

8) ओटमील फेस पैक
ओटमील फेस पैक स्क्रब म्हणून पण काम करते. हे मध आणि दही बरोबर मिक्स करून ह्या मध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळा नंतर १० मिनतांसाठी चेह्यरावर लावून धुवा.

9) पपई-
पपई चेहरा आद्र बनवते. पपई कुस्करून दुधात मिसळा आणि हा पैक १० मिनट चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर धुवा.

10) ग्लिसरीन
चेहरा आद्र बनवण्यासाठी दररोज पाणी मिसळून लावा. हे केल्याने चेहरा एकदम टवटवी राहील.

11) संत्र आणि मध
संत्र्याचे साल सुकल्यावर पीठ तयार करा आणि त्यामधे दुध, मध मिसळून पेस्ट बनवून लावा.

12) बदाम तेल आणि दुध पावडर
कोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी बदाम तेल आणि दुध पावडर एकत्र लावा. हे लावल्याने चेहरावर उजळतो.

13) बेसन आणि दही
हा पैक बनवताना एक लक्षात ठेवा की ह्यामध्ये लिंबू मिसळू नये नाहीतर चेहरा कोरडा होईल.

14) काकडी- लिंबचा पॅक: काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका

Leave a Comment