फेशियल

फेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे . वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचारणा केली असता काही निष्कर्ष मिळाले . साधारण जन्माला आल्यापासून म्हणजेच वयाच्या ० शून्यव्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत स्कीन मृदू व मुलायम असते . १२ व्या वर्षापासून शरीरात बदल होतात . ते हार्मोनल चेंजेस असतात .

पण मुळे , मुली या वयात जाहिरातींच्या विळख्यात येऊन भुलून प्रत्येक क्रीम व इतर कॉस्मेटिक्स वापरतात . यामुळे त्वचेचे नुकसान होते . फक्त क्लिन्झिंग व टोनिंगची या वयात गरज असते . रोज झोपताना कापसाने क्लिन्झिंग मिल्क वापरून चेहरा पुसावा . म्हणजे दिवसभरातील चेहऱ्याला लागलेली धूळधाण निघून जाते . अंघोळीनंतर टोनिंग करावे . हातावर किंवा कापसावर घेऊन सर्व चेहऱ्याला लावावे .

म्हणजे धूळ / प्रदुषणापासून चेहरा वाचेल . २/३ महिन्यांनी पार्लरमधून फेशियल व इतर सौंदर्य उपचार केले तरी घरी रोजच्या रोज पूर्ण शरीराची काळजी घ्यावी . घरगुती Packs , स्वयंपाक घरातील फळे , भाज्या , धान्यांची पीठे यांची मदत यासाठी होते . घरच्या घरी फेशियल करण्यासाठी प्रथम फेशियल करण्याच्या खास बाबी समजून घ्याव्यात .

1) क्लिन्झिंग :-

1) दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा चेहरा क्लिन्झिंग लोशनने स्वच्छ करावा .
2) यामुळे मेकअपचा थर निघून जातो .
3) चेहऱ्याची त्वचेवरील धूळ व कार्बनचा थर निघून जातो .
4) जंतूसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो .
5) बाजारात उपलब्ध असलेले क्लिन्झिंग मिल्क किंवा न तापविलेल्या दुधात २/३ थेंब लिंबूरस मिसळून घरीच क्लिन्झिंग मिल्क करावे किंवा टोमाटो रसात एक चिमुट फ्रुट सॉल्ट टाकून चेहऱ्याला स्वच्छ करावे .

2) टोनिंग :-

1) क्लिन्झिंग झाल्यानंतर त्यावर टोनिंग करणे गरजेचे असते . कारण टोनिंगने चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळते .
2) सुरकुत्या येत नाहीत . तेलकट त्वचा असल्यास त्यास Astringent लावावे .
3) म्हणजे त्वचा तजेलदार दिसते व त्वचेचा झ.क. समतोल होतो . क्लिन्झिंग नंतर बर्फाच्या पाण्याचे हबके मारावेत .
4) तेलकट त्वचेसाठी पाण्यामध्ये कपूरची पूड मिसळून बाटलीत भरून प्रत्येक वेळी हलवून त्याचे चेहऱ्याला हबके मारावेत .

3) डीप क्लिन्झिंग –

1) त्वचेवरील मृत त्वचा (डेड सेल्स) काढण्यासाठी डीप क्लिन्झिंग केले जाते . त्वचेचा पोत , रंग यामुळे चांगला होतो . घरच्या घरी डीप क्लिन्झिंग करण्यास पुढील Pack वापरावे :-
2) ओट मील व दही एकत्र पेस्ट करून चेहऱ्यावर लावावे . पाच ते सात मिनिटाने हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुवावा . ओट वापरण्याचे कारण त्वचेला स्मुथनेस येतो व डेड सेल्स चागंल्या प्रकारे निघतात .

3) डेमीरार शुगर (ब्राऊन शुगर) व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावावे . हात ओले असताना हळूवार मसाज करून साखर विरघळेपर्यंत ठेवून मग चेहरा कोमट पाण्याने धुवावा .
4) त्रिफळा चूर्ण व फेसवॉश क्लिन्झिंग मिल्क एकत्र करून लगेच चेहऱ्यावर लावावे .

4) Pack किंवा मास्क –

1) मसाज झाल्यावर Pack लावावा . मास्कमुळे त्वचेचे टोनिंग होऊन घट्टपणा येतो .
2) मास्कमध्ये दोन प्रकार असतात . ‘सेटिंग मास्क’ व ‘नॉन सेटिंग मास्क’ , सेटिंग मास्कचे कार्य तेलकट त्वचेला उपयोगी ठरते .
3) त्वचेतील जास्तीचे तेल मास्क शोषून घेतो . त्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन त्वचेचा पोत सुधारतो .
4) हे मास्क चेहऱ्यावर सुकून घट्ट झाले की काढावे . मास्क काढताना घासून जोराने न धुता हलक्या हाताने काढावे .
5) नॉन सेटिंग मास्क कोरडया त्वचेसाठी उपयोगी पडतात . त्वचेला चांगल्या प्रकारे आर्द्रता , थंडावा व पोषण मिळते .
6) फळांचे रस , गर किंवा पातळ चकत्या लावणे हे नॉन सेटिंग मास्कचे प्रकार आहेत . हे त्वचेवर सुकत नाहीत .
7) फेशियल पूर्ण झाल्यावर चेहऱ्याला सनस्क्रीन किंवा सौम्य मॉइश्चरायझर लावावे . त्वचा कोरडी न होता मऊ आणि तजेलदार होते

Leave a Comment