भुजंगासन

1) या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनालाभुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले.

2) आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे.

3) आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे. हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता.

4) सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता.

5) ही काळजी आवश्यक घ्या: – हे आसन करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नाक, अन्यथा तुमच्या पाठीवर त्याचा ताण निर्माण होईल. ज्यांना पाठीचे दुखणे आहे, त्यांनी डॉक्टर अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा.

Leave a Comment