इतर काळजी

अगोदरचे मूल ३ वर्षांचे झाल्याशिवाय दुसरे मुल होऊ देऊ नये :

१) आईच्या पहिल्या बाळंतपणातील झीज तीन वर्षाच्या आत भरून येत नाही.

२) तीन वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास आईची तब्येत ढासळते व त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या मुलावरही होतो व ते अपुऱ्या वाढीचे जन्माला येऊ शकते.

३) पहिल्या मुलाकडेही दुर्लक्ष होते व त्याचीही वाढ नीट होत नाही. अशाप्रकारे दोन्ही मुले कमकुवत बनतात व दोघांचेही जीवन धोकादायक बनू शकते.

जुळी कशी जन्मतात :

मासिक पाळीच्या प्रारंभानंतर दहाव्या ते अठराव्या दिवसाच्या मधल्या काळात स्त्रीच्या प्रजोत्पादक केंद्रीयात एक अंड तयार होते. या काळात जर स्त्रीचा पुरुषाशी संबंध आला तर पुरुषाच्या शुक्राणूपैकी एक, स्त्रीच्या बीजांडामध्ये शिरतात. हे एकत्र आली की फलन होते आणि स्त्री गरोदर राहते. परंतू काहीवेळा गर्भधारणेनंतर अंड्याचे आपोआप दोन भागात विभाजन होते आणि हे दोन्ही भाग गर्भाशयात दोन गर्भ म्हणून विकसित होतात. त्याचा परिणाम त्या स्त्रीला एकाचवेळी दोन बाळ होतात. अशाप्रकारे झालेल्या या दोन बाळांच्या चेहऱ्यात आणि रुपात साम्य दिसते. त्याची बरीच लक्षणेही समान असतात. ही दोन्ही बालके दोघेही मुलगे व दोघेही मुली असू शकतात. याचे कारण ही दोन्ही बालके एकाच अंडाणूपासून निर्माण होतात. काहीवेळा अशीही एक शक्यता असते की, पुरुषाच्या दोन शुक्राणू अलगपणे एकाच स्त्रीच्या दोन अंडाणूमध्ये प्रवेश करतात. त्यातून गर्भाशयात दोन गर्भ विकसित होऊन ती स्त्री दोन बालकांना जन्म देते. अशा प्रकारे जन्मलेली दोन मुले एकमेकांहून भिन्न असू शकतात. त्यांचे लिंग समान असू शकते वा भिन्न्ही असू शकते.

Leave a Comment