थ्रेडींग करताना घेण्याची काळजी

1) थ्रेडिंग करण्यापूर्वी ती जागा डेटॉल किंवा अँस्ट्रोजनच्या साहाय्याने चांगल्याप्रकारे स्वच्छ करावी.

2) त्यानंतर पावडर लावावी त्यामुळे आपल्या चेहर्यानरील घाम तसेच तेल कमी होण्यास मदत होईल.

3) थ्रेडिंग केल्यानतंर जर रँशेज किंवा त्वचा लाल झाल्यास त्यावर सोप्रोमाईसिल किंवा मॉयच्छराइजर लावावे.

4) थ्रेडिंगपूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. हलक्या हाताने चेहरा पुसावा. याने वेदनांची तीव्रता कमी होईल.

5) थ्रेडिंगपूर्वी चेहर्याववर टोनर लावावं. याने ओलावा मिळतो.

6) थ्रेडिंग नेहमी तज्ज्ञांकडून करवावी. ब्यूटिशियन तज्ज्ञ नसल्यास विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.

7) थ्रेडिंग केल्यावर त्वचा लाल होत असेल, जळजळ होत असेल, किंवा पुरळं येत असल्यास लगेच बर्फ लावावा.

8) थ्रेडिंगनंतर त्यावर क्रीम किंवा गुलाबजल लावावं. याने रॅशेस येण्याचा धोका कमी होतो.

9) थ्रेडिंगनंतर काही तास कोणत्याही रसायनयुक्त सौंदर्य उत्पादन वापरणे टाळावे.

10) थ्रेडिंगनंतर स्टीम ट्रीटमेंट घेणे टाळा.

Leave a Comment