एरंड | Castor Benefits In Marathi

1) एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे हे एरंडेल.तिखट, उष्ण, प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो.

2) एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे त्यामुळे कावीळ होत नाही.

3) भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटते, अपचन झाले, पोटात दुखत असेल अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादे लोण व सुंठीची पूड घालून चार सत्पके द्यावा.

4) कंबर दुखत असेल, खाली वाकता येत नसेल, चमक मारत असेल अशा वेळी वेली एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढय़ामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा याने कंबरदुखी थांबते.

5) हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी एक कप ताजे गोमुत्र घ्या. त्यात दोन तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल.

6) कावीळसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडेला आहे त्यामुळे कशाप्रकारची पण कावीळ असो, लवकर बरी होते, तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणी एरंडेलचा वापर.

7) एरंडमूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

8) एरंडेल तेल तर कोठा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहेच.

9) एरंडाची पानेसुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशामक उपचारांसाठी वापरली जातात;

10) तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगी असतात.

Leave a Comment