बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दयावा ?

Diet for growing baby in marathi

१) सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला भाज्यांचे सूप, वरणाचे पाणी, वरचे दूध, फळांचा रस, शहाळ्याचे …

Read more

बाळाचे वजन कमी असल्यास काय काळजी घ्यावी ?

tips for underweight baby in marathi

१) त्याला सतत आईच्या जवळ ठेवावे. २) बाळाला नेहमी गुंडाळून ठेवावे. डोक्यावर टोपी घालावी. ३) आईने बाळाला स्तनपान नीट काळजीनं …

Read more

सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान- (Side effect continuous uses air conditioner)

आपल्याला कदाचित माहित नसेल, AC मध्ये सतत राहिल्या मुळे आपल्याला याचे खूप दुष्परिणाम होतात. बऱ्याच प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. खास करून गर्मी च्या दिवसात लोक गर्मी पासून वाचण्यासाठी पंखा, कुलर चा वापर करतात. पण तरीही गर्मी पासून आपल्याला सुटकारा मिळत नाही, म्हणून लोक AC चा वापर करतात. आजकाल फक्त AC चा वापर ऑफीस किंवा हॉटेल मध्ये नाही तर कार व घरा घरा होत आहे. तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील AC चा वापर होतो.

पण आपल्याला कदाचित माहित नसेल AC च्या सतत वापराणे किती दुष्परिणाम होतात. तसेच आपण वेगवेगळ्या आजारांना देखील आमंत्रण देतो. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान 

आपण जेंव्हा AC रूम मध्ये काम करतो तेंव्हा आपल्याला बाहेरील तापमाना बद्दल माहिती नसते. AC रूम मध्ये बाहेरील हवा आत येत नाही, दरवाजे बंद ठेवावे लागतात. ज्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक हवा मिळत नाही. जेंव्हा आपण AC रूम मधून बाहेर पडतो तेंव्हा बाहेरील तापमान वेगळे असते. या बदलेल्या तापमानामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.

AC चा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. आपली डोके दुखी ची समस्या वाढते. AC मध्ये सतत काम केल्याने रक्ताभिसरण वाढते. म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त वाहते त्याच्या गतीत अंतर पडतो. ज्यामुळे स्नायू मध्ये ताण पडतो, तसेच आपले डोके जड जड वाटते आणि कमजोरी वाटते व आळसपण वाढतो.

जे लोक सतत AC मध्ये असतात त्यांना AC ची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात. AC ची थंड हवा या साठी कारणीभूत असते. AC च्या थंड हवे मुळे शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे आपली त्वचा कोमेजते. त्वचे सोबत केसांच्या देखील समस्या होतात. आणि आपले केस पांढरे व्हायला लागतात. तसेच आपल्याला त्वचे संबंधी रोग होतात. सतत AC मध्ये काम करणे हे आपल्या केसांसाठी व त्वचे साठी हानीकारक आहे.

जर आपण contact लेन्स वापरात असाल तर आपल्याला डॉक्टर ने  AC मध्ये जास्त वेळ काम करण्यास मनाई केली असेल. कारण अशावेळी डोळे दुखायला लागतात, कारण सतत AC मध्ये काम करण्यामुळे contact लेन्स आपल्या डोळ्यांना चिकटतात. ज्यामुळे डोळ्यात आग होते आणि यामुळे डोळ्यातून पाणी येतो व इतर डोळ्यांच्या समस्या होतात. डोळे लाल होणे, डोळे दुखणे म्हणून AC मध्ये जास्त काळ राहु नका.

जर आपण सांधे दुखी पासून ग्रस्त असाल तर याचे कारण आपल्या शरीराचे तापमान असू शकत. शरीरात उचित मात्रेत गर्मी असणे आवश्यक असते. सतत AC च्या थंड हवेमुळे आपल्या शरीराच्या तापमानावर याचा परिणाम पडतो यामुळे आपल्याला सांधे दुखी सारख्या समस्या होतात. आपली हाडे आखडतात, जास्त करून ढोपे दुखतात. हे आपल्याला सामान्य वाटत असेल पण बऱ्याच वेळा हे आजार गंभीर रूप धारण करतात व आपल्याला संधिवात देखील होऊ शकतो. खास करून वृद्ध माणसांना AC मध्ये सतत राहणे धोकादायक आहे. AC ची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात . म्हणून AC मध्ये सतत राहू नये.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

भूक वाढवण्याचे उपाय व भूक न लागण्याचे कारण(Loss of Appetite Treatment)

भूक वाढवण्याचे उपाय:- आजकालच्या जीवनात प्रत्येकजण तणावग्रस्त जीवन जगत आहे, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला उर्जा मिळणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे, आपल्याला भूक लागत नसेल किवा आपण योग्य पद्धतीने वेळेवर जेवत नसाल तर ही गंभीर समस्या आहे. कारण शरीराला योग्य पोषक तत्वे आहारातून मिळतात, योग्य वेळेवर आहार न घेणे किंवा कमी आहार घेणे यामुळे वजन घटणे  किंवा शारीरिक कमजोरी अशक्तपणा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

लोक जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करतात , पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे लोक आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. मित्रांनो भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

अजून आणखी काही करणे आहेत ज्याच्या मुळे  आपल्याला योग्य तो आहार घेता येत नाही बदलेल्या जीवनशैली मुळे  मुलामध्ये भुकेचे प्रमाण कमी झाले आहे आई वडलांची डॉक्टर कडे ही तक्रार असते कि आमचा मुलगा/मुलगी इतर मुलांपेक्षा कमी जेवतो, योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

आपल्यला भूक न लागण्याची समस्या आपण घरगुती पद्धतीने सोडूवू शकतो, सफरचंदा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात त्याच बरोबर आपली भूक देखील वाढण्यास मदत करतात.  सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खा किंवा सफरचंदाचा जूस प्या यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होते व आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते.

भूक वाढवण्यासाठी खालील साधे उपाय करा 

खजुराची चटणी बनवा त्यात लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी ही चटणी खा, असे केल्याने आपल्याला भूक लागेल

वेलची ही थंड असते वेलची आपल्या शरीरात गारवा निर्माण करते, वेलची चे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर प्या. हे पाणी औषधा सारखे काम करते ज्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये भाज्यांचे महत्व सांगितलेले आहेत. एक वाटी टोम्याटोचा रस घ्या त्यात एक चमचा आल्याचा रस व गाजराचा रस मिळवा. हे मिश्रण प्यायल्याने  आपली भूक वाढेल.

एक चमचा ओवा व चिमुटभर काळा मीठ वाटीभर पाण्यामध्ये मिसळून ते मिश्रण उकळून घ्या थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या व हे मिश्रण प्या काही दिवस हे मिश्रण दिवसातून एकदा प्या असे केल्याने आपली भूक वाढेल.

एक चमचा मधामध्ये थोडी काळी मिरी मिक्स करून दिवसातून २ – ३ वेळा हे मिश्रण चाटत जा यामुळे देखील आपली भूक वाढेल.

लिंबू कापून घेऊन त्यावर काळ मीठ लाऊन ते खाल्यामुळे यामुळे आपली भूक न लागण्याची समस्या दूर होईल.

आणखी काही भूक वाढवण्याचे सोपे उपाय आहेत जसे एक ग्लास पाणी उकळून त्यात चिंच मिळवा चिंच मऊ झाल्यावर चिंच त्याच पाण्यात मिसळून घ्या व उरलेली चिंच काढा या चटणीत चिमुटभर मीठ, चीमुठ्भर काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या आणि हया मिश्रणात पुन्हा पाणी मिसळून घ्या या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर भूक लागेल हा एक आयुर्वेदिक उपाय आहे.

पुदिन्याची चटणी व मधाचे मिश्रण आपली भूक वाढवते तसेच आपले पोट निरोगी ठेवते .पुदिना आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण करतो व आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो, आणि पोटा संबंधी समस्या दूर करतो, पुदिन्याची चटणी एक वाटी मधात मिळउन खाल्याने अपली भूक कमी लागण्याची समस्या दूर होईल

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

गर्भधारणा दरम्यान निरोगी वजन वाढवणे – Healthy Weight During Pregnancy

गर्भधारणा हि एक अशी वेळ आहे जेंव्हा आपल्याला वाढलेल्या अधिक वजनाची कोणतीही अडचण नसते, गर्भधारणे वेळी वजन वाढल्यामुळे आपण अधिक जाडे झालो आहोत असा अर्थ होत नाही, गर्भावस्थेत वजन वाढणे किंवा बाळाची वाढ होत असताना गर्भधारणेच्या पूर्ण अवधी मध्ये वजन वाढणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या वेळेस, वजन वाढणे हे सामान्य कारण आहे परंतु आपण ते सहजपणे नियंत्रित करू शकता. आणि आपण गर्भधारणेदरम्यान वजन कमी करू नये.

परंतु वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाय करू शकता, पण हा एक प्रश्न आहे गर्भधारणेदरम्यान किती वजन जरुरी आहे व किती वजन हानिकारक आहे. गर्भावस्थेत BMI स्थितीत पहिल्या तीन महिन्यात वजन १ – २ किलो हून अधिक वाढले नाही पाहिजे. गर्भावस्थेच्या चौथ्या व आठव्या महिन्यात सरासरी वजन २ किलो हून अधिक वाढले नाही पाहिजे. सामान्यतः नव्या महिन्यात बाळ पूर्ण विकसित झाल्यावर वजन वाढणे थांबते.

या अवस्थेत वजन नियंत्रित ठेवणे खूप आवशक आहे, नियंत्रित वजन हे बाळाच्या व आईच्या आरोग्या साठी चांगले आहे. आणि आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे खूप आवशक आहे, गर्भावस्थेत किती वजन असाव. आपणाला गर्भावस्थेत अनावश्यक वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यासाठी आपण काही उपाय करू शकता.

1. कॅलरीस च सेवेन बंद करा :- गर्भधारणेच्या वेळी शरीराचे वाढलेले वजन चांगले असते परंतु या अवस्थेत कमी कॅलरी युक्त पदार्थांचे सेवन करावे कारण कॅलारीस ह्या आपल्या बाळासाठी कोणत्याही प्रकारे फायदेमंद नसतात, गर्भधारणेच्या काळात फास्ट फूड पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे, आपण किती कॅलरीज चे सेवन करत आहोत याच ध्यान ठेवाव, जर आपले वजन कमी होत असेल तर आठवड्यातून एकदा फास्ट फूड पदार्थांचे सेवन करू शकता, परंतु असे पदार्थ नेहमी खाण्याचे टाळावे.

2. गर्भावस्थेत Diet करू नये :- गर्भावस्थेत आपल्या Diet चे खास ध्यान ठेवा, पण जर आपण अल्पाआहार  करून वजन कमी करत असाल तर ते शरीरासाठी व बाळासाठी उपयोगी नाही. गर्भावस्थेत आपले वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे असते, गर्भावस्थेत पौस्टिक व संतुलित आहार करावा, कमी कॅलरीस युक्त पधार्तांचे सेवन करावे

३. नियमित व्यायाम करावा :- आपण गर्भधारणेच्या आधी व्यायाम करत असाल तर गर्भवती झाल्यावर जो पर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तो पर्यंत व्यायाम बंद करू नका, गर्भावस्थेत जास्तकरून महिला आपले दैनंदिन कामकाज करण्याचे टाळतात व आराम करणे पसंद करतात, गर्भावस्थेत कठीण व्यायाम करू नये, वजन उचलू नये हलक फुलक व्यायाम कराव उदा. चालणे, कवायतीचे प्रकार, ते पण डॉक्टर च्या सल्याने करावेत

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

लहान मुलांचे दात येतेवेळी घेण्याची खबरदारी | Tips for baby tooth care in Marathi

लहान मुलांचे दात येतेवेळी घेण्याची खबरदारी | Tips for baby tooth care in Marathi लहान बाळांच्या बाबतीत पालकांची जबाबदारी खूप …

Read more