केसांचे सौंदर्य | Beautiful Hairs Tips In Marathi

Beautiful Hairs Tips In Marathi

१. सध्याच्या धावत्या जीवनशैलीमुळे अशा कितीतरी महिला आहेत, ज्यांना आपल्या केसांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे कितीही सुंदर केस …

Read more

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपचार-(Home remedies to eliminate white hair problems)

जर आपण केसांच्या समस्ये मुळे त्रस्त असाल तर या समस्ये वर काही उपाय जाणून घेऊया :

आवळा-आवळा हा फळ जरी छोटा असला तरी खूप गुणकारी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आवळ्याचा नियमित पणे वापर केल्याने त्याचा आपल्या केसांसाठी देखील फायदा होतो. आवळ्याचा वापर फक्त आहारात न करता आवळा मेहन्दीत मिळवून केसांमध्ये लावा. तसेच आवळा कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नारळाचे तेल थोडे गरम करून त्यात हे तुकडे टाका व केसा मध्ये लावा आपल्याला फायदा होईल.

black tea (काळा चहा) व coffee :

जर आपल्याला आपले केस काळे करायचे असतील तर black tea व cofee च्या अरक ने केस धुवा, असे आठवड्यातून तीन वेळा करा.

एलोवेरा (कोरफड ) :

जर आपण पांढरे केस व केस गळती पासून त्रस्त  असाल तर केसात एलोवेरा जेल  आणि लिंबा चा रस मिळवून केसांमध्ये लावा.

तूप :

जर आपले केस सफेद होत असतील तर केसांची तुपाने मालिश करा. आपल्या सफेद केसांची समस्या दूर होईल.

दही :

जर आपल्याला केस प्राकृतिक रूपाने काळे करायचे असतील तर दहीचा वापर करा. दही मध्ये मेहंदी बरोबर मात्रेत मिळवा आणि हे मिश्रण केसांमध्ये आठवड्यातून एकवेळा लावा आपल्याला फायदा होईल.

 कडीपत्ता :

जर आपले केस पांढरे होत असतील तर कडीपत्ता आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. कडीपत्याची पाने एका तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या किंवा कडीपत्याची पाने कापून गरम खोबरेल तेलात मिळवून लावा, याचा आपल्याला फायदा होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

टक्कल वर घरगुती उपाय-(Home Remedies To Cure Baldness)

आपण सुंदर दिसण्या साठी काहि ना काही उपाय करत असतो. टक्कल पडणे ही एक नैसर्गिक समस्या आहे जसे म्हतारेपण याच्यावर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही, पण जर याची लक्षणे आपल्यात वेळेच्या आधीच दिसत असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. जर आपले केस वेळेच्या आधीच गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील आणि आपल्याला शारीरिक कमजोरी जाणवत असेल तर हि म्हातार पणाची लक्षणे आहेत आणि जस जसे आपले वय वाढत जाते तसे आपले केस कमी व्हायला लागतात.

टक्कल वर घरगुती उपाय.

जर आपले केस वेळेच्या आधी गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्या आहे. दुषित भोजन आणि प्रदूषण हे कारण देखील टक्कल पडण्यासाठी असू शकतात. आपल्या शरीरात पोष्टिक तत्वांच्या कमी मुळे केस गळायला लागतात. म्हणून आपल्याला टक्कल पडण्याच्या समस्येवरील उपचार जाणून घेणे आवश्यक आहे आणि याच्यावर घरगुती उपचार देखील आहेत.

टक्कल पडण्याच्या समस्येवर उपचार कठीण आहेत, कारण जे लोक या समस्यांचा सामना करत आहेत त्यांनी आपले केस पुन्हा उगवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. पण केस गळणे हि एक नैसर्गिक समस्या आहे जी आपल्या वाढत्या वयानुसार हि वाढत जाते. जर आपण देखील या समस्येवर उपचार केले असतील आणि तरी देखील काहीच फरक पडत नसेल  तर हि एक मोठी समस्या आहे. आपले केस मुळापासून निघाले असतील तर ते पुन्हा उगवणे कठीण आहे.

पण आयुर्वेदात प्राचीन शास्त्रात या समस्येवर खूप उपचार आहेत. ज्यांचा आपण वापर करून टकले पणा दूर करू शकतो. याच्यावर कोणते कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊयात.

टक्कल वर घरगुती व आयुर्वेदिक उपाय.

आपल्या प्राचीन शास्त्रात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत, जर आपल्याला देखील केस गळण्याची समस्या दूर करायची असेल तर आयुर्वेदातील उपचार करू शकता आणि हे उपाय सोपे व सरळ असतात. तसेच हे उपचार खूप कमी खर्चिक असतात आणि हे उपचार आपण घरी बसून करू शकता व नैसर्गिक रूपाने आपण आपले केस परत उगवू शकता. त्याचप्रकारे याच्यात आपला वेळ देखील वाचेल आणि पैसा वाया जाणार नाही. ह्या उपचारामुळे आपले केस नैसर्गिकरित्या येतील आणि आपले केस काळे व घनदाट होतील.

मेथीचा उपयोग- मेथीचा वापर जास्त करून जेवणा मध्ये केला जातो याच्यात खूप सारे पौष्टीक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दही देखील आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. मेथी आणि दही एकत्र मिसळून याचा उपयोग करत असाल तर आपल्याला याचा फायदा होईल. यासाठी मेथी कमीत कमी १२ तासानसाठी पाण्यात भिजून ठेवा आणि नंतर मेथीला बारीक वाटून घ्या आणि हि वाटलेली मेथी दहित मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळावर लावा. एक तासा साठी तसेच ठेवा आणि नंतर केस धुऊन घ्या आपल्याला फायदा होईल. कारण मेथी आणि दही मध्ये निकोटीनिक एसिड आणि प्रोटीन चंगल्या मात्रेत असतात जो आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना पोषित करतो ज्यामुळे केसांची वाढ होते.

उडीत डाळ पण आपल्या टक्कल पडण्याच्या समस्येवर लाभदायक आहे. कारण डाळिंन मध्ये खूप प्रकारचे पोषक तत्व असतात. जे आपल्या केसांना आणि शरीराला निरोगी ठेवतात. उडीत डाळीचा उपयोग करण्यासाठी डाळीचे साल काढून उकडून घेऊन ती वाटून घेतली पाहिजे आणि रात्री झोपताना हा लेप आपल्या केसांना लावा आणि रात्रभर लाऊन ठेवा आणि फडक्याने झाकून ठेवा. असे आपण आठवड्यातून चार ते पाच वेळा करत असाल आपली केस गळण्याची समस्या दूर होते.

या समस्येवर (मुलेठी) जेष्ठमध एक रामबाण उपाय आहे. जेष्ठमध चा उपयोग करण्यासाठी जेष्ठमध वाटून घेऊन यात दुध आणि केसर मिसळून एक पेस्ट तयार करा आणि हि पेस्ट झोपायच्या आधी आपल्या डोक्यावर चांगल्या प्रकारे रात्रभर लाऊन ठेवा आणि फडक्याने झाकुन ठेवा. झाकुन ठेवल्यामुळे आपले इतर कपडे खराब होणार नाहीत. सकाळी उठल्यावर केस चांगल्या प्रकारे धूउन घ्या हा लेप आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावत असाल तर आपली टक्कल पडण्याची समस्या दूर होईल व केस गळणे हि थांबेल.

आवळा, ब्राम्ही तसेच भृंगराज या तिघांना आयुर्वेदात केसांसाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते कारण हे आपल्या केसांचे गळणे थांबवतात आणि आपले केस उगवायला मदत करतात. आवळा, ब्राम्ही व भृंगराज हे केवळ केसांसाठी फायदेमंद नाही तर इतर आजारांवर देखील गुणकारी आहेत. केसांमध्ये लावण्यासाठी या तिघानाही एकत्र करून वाटून घ्या आणि हे मिश्रण एका लोखंडी कढई मध्ये फुगण्यासाठी रात्रभर ठेवा आणि सकाळी हे चुरगळून लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये १५ मिनीटान साठी लावा असे एका आठवड्यात दोन वेळा करा असे केल्याने केस गळती थांबेल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

कोंडा (dandruff) होण्याची कारणे व उपाय-(Causes and measures for Dandruff)

आपण सर्वच आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरी देखील केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा म्हणजेच dandruff. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील वेग वेगळे उपाय करत असतात. सगळ्यात आधी जाणून घेवूयात केसांमध्ये कोंडा का होतो व त्याची कारणे. केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.

संक्रमणा मुळे देखील केसात कोंडा होतो. कारण आपल्या डोक्याच्या त्वचे मध्ये मृत कोशिका असतात. ज्यांना डेड स्कीन सेल्स देखील म्हणतात. कान, नाक, चेहरा, पोट, पाठन येथे देखील हि समस्या होऊ शकते. आपल्या डोक्यात जर कोरडेपणा व खाज होत असेल तर याचा अर्थ असा होतो कि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करत नाही आणि एनीमा हा रोग झाल्यामुळे देखील त्वचेत कोरडेपणा येऊन आपल्या केसांमध्ये कोंडा होतो.

केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील केसांमध्ये कोंडा होतो. त्याच बरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी पिण्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक प्रोडक्टस चा वापर करतो, यांच्या परिणामांमुळे मुळे देखील कोंडा होऊ शकतो.

जर आपल्या केसात कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसात कोंड्यामुळे खाज सुटत असेल तर हि एक गंभीर समस्या होऊ शकते. आपल्या केसात अजून इतर समस्या होऊ लागतात. जर आपल्याला या समस्या मुळा पासून नष्ट करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय करून पहा. यामुळे आपल्या केसातील कोंडा व कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस जाड, मोठे, दाट आणि सुंदर होतील.

१. लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा व नंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.

२. मेथी मुळे आपले अनेक रोग बरे होण्यास मदत होते. जर आपल्याला आपले केस मजबूत करायचे असतील व कोंडा घालवायचा असेल तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी हि मेथी वाटून घ्या व याची पेस्ट बनवा आणि हि पेस्ट कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्या केसांमध्ये व डोक्यात लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. असे महिन्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा करा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा नाहीसा होईल. अंघोळ करायच्या आधी जर आपण केसांमध्ये लिंबाच्या रसाने मालिश करत असाल तर यामुळे आपल्या केसातील चिकटपणा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील. विनेगर (सिरका) व पाणी समान मात्रेत एकत्र मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा व सकाळी आपले केस स्वच्छ धुवा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

३. दही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे.  आपल्या केसात थोडा दही कमीत कमी एका तासासाठी लावून ठेवा व नंतर  केस नीट धुवून घ्या, असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. आपल्याला हि प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यानें फायदा होईल.

४. अंडा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असतो, अंडा खाल्याने आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमी दूर होते. तसेच अंडा आपल्या केसांसाठी देखील फायदेमंद आहे. अंड्याची पेस्ट बनवून आपल्या केसांमध्ये लावा यामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होईल. आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस चमकदार व दाट होतात यामुळे आपल्या केसांचे गळणे थांबते.

५. केसांमध्ये बदामाचा तेल किंवा नारळाचा तेल किंवा जैतून चा तेल गरम करून आपल्या केसांमध्ये मालिश करत असाल तर आपल्या केसातील कोंडा दूर होईल. मालिश केल्यावर आपले केस तसेच ठेवावेत. असे केल्याने आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. केस लांब व घनदाट होतील. तसेच ५ चमचे नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये लावा. सफरचंद व संत्रा बरोबर मात्रेत घेवून याचा लेप बनवा आणि आपल्या डोक्याला लावा आणि हा लेप २० ते ३० मिनिटांसाठी तसाच लावून ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवून घ्या आपले केस मुलायम व कोंडामुक्त होतील.

६. कडुलिंब मध्ये खूप सारे औषधी गुण असतात ज्यामुळे आपले अनेक रोग बरे होतात.  कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसातील कोरडेपणा, पांढरे केस यासारखी समस्या दूर होईल आणि आपले केस लांब, दाट व कोंडामुक्त होतील.

७. तुळस देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. आपल्याला फायदा होईल.

आपल्या केसातील कोंडा दूर करण्यासाठी २ चमचे लसून पावडर,  एक चमचा लिंबाच्या रसात मिळवा आणि त्याचा लेप बनवा आणि हा लेप आपल्या डोक्यात लावा. जवळ जवळ ४० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस स्वच्छ धुवून घ्या असे केल्याने आपले केस लांब, दाट होतील आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल.

८. केसांसाठी रीठ्या पासून बनलेला साबण खूप उपयोगी असतो. रिठा पावडर घ्या व लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल. तसेच कांद्याचा रसामध्ये आल्याच्या रस मिळवा व यात बीट मिळवा आणि तिघांना चांगल्या प्रकारे वाटून घ्या आणि लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा. सकाळी आपले केस स्वच्छ धुवून घ्या जर आपण असे ४ ते ५ रात्र करत असाल तर आपल्या केसातून कोंडा दूर होईल. बेसन ला दही सोबत मिळवा व लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये २० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस चंगल्या प्रकारे धुवून घ्या आपल्या केसातील कोंडा दूर होईल.

९. बेकिंग सोडा देखील आपल्या केसांसाठी उपयोगी आहे. केस धुताना केसांमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा मिळवा, बेकिंग सोड्यामुळे कोंडा दूर होतो. रोजमेरी ची पाने विनेगर सोबत पिळून घ्या व आपल्या केसांमध्ये १५ ते २० मिनीटान साठी लावा आणि नंतर केस धुवून घ्या असे केल्याने आपल्या केसांसाठी फायदेमंद ठरेल. तसेच रोजमेरी चा तेल व नारळाचा तेलाच मिश्रण देखील लावू शकतो व आपले केस धुवून घ्या हे काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

नख वाढवायचे घरगुती उपाय- (Grow Nails Faster Naturally At Home)

नख सुंदर दिसणे आणि त्यांना वाढवणे फॅशन समजले जाते, नखे हि कोरीव, सुंदर व थोडी मोठी असल्याने आपल्या हातांची शोभा वाढते. डॉक्टरांच्या अनुसार ज्यांची नखे चांगली असतात त्यांचे आरोग्य नेहमी चांगले असते. डॉक्टर पेशंट ची नखे पाहून देखील त्याच्या आजार बद्दल सांगू शकतात, नखे आणि सुंदर केसांमुळे महिला खूप सुंदर दिसतात. केस आणि नखे एकाच प्रकारच्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि त्या प्रोटीन चे नाव आहे केराटीन (Keratin). नखांची वाढ पटकन होते, नख दर महिन्याला १ इंचाच्या १० व्या भागाएवेढे वाढतात, कधी कधी नख वाढण्याचा वेग कमी होतो आणि हि चांगली बाब नाही आहे, जेव्हा आपल्या शरीरात कसली तरी कमी असते तेव्हा नख वाढण्याची गती कमी होते.

नखे हळूहळू वाढणे, नखे ठिसूळ होणे, नखांचे तुटणे यासाठी आपल्या जेवणात आलेला बदल कारणीभूत असू शकते. म्हणून पोष्टिक आहार आपल्याला या समस्येपासून वाचवू शकतो. आपण आपल्या नखांची योग्य देखभाल करायला हवी, ज्यामुळे आपली नख सुंदर व स्वस्थ बनतील.

नख वाढवायचे घरगुती उपाय

जैतून (olive) च्या तेलाचा वापर:  झोपण्या च्या आधी जैतून चे तेल गरम करून ५ मिनिटा साठी या तेलाने आपल्या नखांची मालिश करावी, १५ ते ३० मिनिटासाठी जैतून च्या तेलामध्ये नख बुडून ठेवा.

संत्र्याच्या रसचा उपयोग:  संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिटासाठी आपली नख बुडून ठेवा व नंतर गरम पाण्याने धुवा त्यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नखे चमकदार होतील.

लिंबाच्या रसाचा प्रयोग:  लिंबाचा रस व जैतूनचा तेल गरम करा. हे कोमट झाल्यावर १० मिनिटासाठी त्यात आपली नखे बुडवून ठेवा नाहीतर लिंबाचा तुकडा घेऊन ५ मिनिट नखांची मालिश करू शकता.

नारळाच्या तेलाचा प्रयोग: रात्री झोपण्या आधी नारळाच्या तेलाने आपल्या हाताची व नखांची मालिश करा ,यामुळे आपल्या रक्ताचा परीचारण चांगले होईल आपल्याला याचा खूप फायदा होईल, यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नख चमकदार होतील.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

उंची वाढवण्याचे घरगुती उपचार- (home remedies to increase height naturally)

उंची वाढवण्याचे घरगुती उपचार – उंच दिसणे सर्वांनाच आवडते, एखादी व्यक्ती उंच असेल तर त्याचे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. ज्यामुळे त्यांचा इतर लोकांच्या मध्ये आत्मविश्वास आणि रुतबा वाढतो तसेच पोलीस भरती किंवा सैन्यामध्ये जास्त करून उंच लोकांची निवड केली जाते. तसेच मॉडलिंग सारख्या क्षेत्रात उंच लोकांना प्राधान्य दिले जाते. उंच लोकांच एक आकर्षक व्यक्तिमत्व असते.

उंच लोकांना कोणतेही काम करणे इतरांच्या तुलनेत सोपे जाते. उंची हि एक ठराविक मर्यादित उंची पर्यंतच वाढते, उंची वाढण्यावर देखील एक वयोमर्यादा आहे. साधारणतः उंची हि वयाच्या १८ वर्षा पर्यंतच वाढते. सामान्य पेक्षा कमी उंची असणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच लोकांना वाटते कि उंची हि १८ वर्षा पर्यंतच वाढते पण अस नाही उंची १८ वर्षा नंतर देखील वाढू शकते.

उंची वाढवण्याचे काही सोपे उपाय 

१८ वर्षानंतर हि उंची वाढू शकते, जे लोक उंच असतात ते दिसायला आकर्षकच दिसतात तसेच त्यांच्यात आत्मविश्वास देखील वाढलेला असतो. काही क्षेत्रात तर एका विशिष्ट उंचीची मर्यादा असते. आयुर्वेदात काही अशी औषध आहेत ज्यामुळे आपली उंची वाढायला मदत होते. आणि त्याच बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण मजबूत होतो. या आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्या मुळे  आपण वयाच्या २५ व्या वर्षपर्यंत उंची वाढू शकता. शरीरात HGH हे हार्मोन्स उंची वाढण्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात. HGH म्हणजे human growth Hormone. जर कोणाच्या शरीरात  HGH हे हार्मोन्स कमी असतील तर त्यांची उंची जास्त वाढत नाही. HGH हार्मोन्स हे purgatory gland  मधून निघतात म्हणून आपली उंची वाढते. जर आपल्या शरीराला योग्य ते प्रथिने व पोषक तत्वे मिळत नसतील तर आपल्या शरीराचा विकास होत नाही म्हणजेच हाडांची वाढ होत नाही, आणि यामुळे कितीतरी लोकांची उंची कमी राहते. आणखी एक कारण म्हणजे ज्यांच्या आई वडलांची उंची कमी असेल तर त्यांच्या मुलांची देखील उंची कमी असते, याला अनुवांशिक समस्या म्हणतात हि समस्या अनुवांशिक असेल तर याच्यावर उपचार सोपे नाहीत पण होऊ शकतात.

उंची वाढवण्यासाठी पोष्टिक आहार करणे खूप फायदेमंद आहे.      

आपल्याला जर आपली उंची वाढवायची असेल तर काही घरगुती उपाय करून पहा हे उपचार केल्याने आपली उंची वाढायला मदत होईल. त्याच प्रमाणे आपली त्वचा आणि आपले आरोग्य चांगले राहील, आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष ठेवावे, पोषक आहार करावा. कोल्ड ड्रिंक कमी प्या. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही,. फास्ट फूड व जंक फूड चे कमीत कमी सेवन करा, याच्या सततच्या व जास्त सेवनाने आपली उंची वाढत नाही तर आपण जाडे होतो. आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते. दुध, दही, पनीर, मक्खन, कडधान्य च्या सेवनाने आपली उंची वाढण्यास मदत होते.

काही अशी तत्वे असतात ज्यामध्ये विटामीन्स, मिनरल्स, आणि प्रथिने असतात असे पदार्थ सेवन करा. प्रथिने हि  दुध, अंडी, दही यामध्ये खुप असतात. ताज्या फळांचा आहारात वापर करा त्यामध्ये विटामीन्स व मिनरल्स असतात. त्याच बरोबर फळांचा रस, हिरव्या भाज्या, नियमित पणे खात जा, उंची वाढण्यासाठी आपली चयापचन क्रिया मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी पोषक आहार घेतल्याने आपल्या शरीरात चरबी जमा होणार नाही यामुळे आपली उंची वाढायला मदत होईल. मिनरल्स आणि खनिजे हाडांच्या उतकांचा निर्माण करतात, हे हाडांच्या विकास तसेच शरीरात रक्त प्रवाहात सुधार आणतात, जर आपल्याला आपली उंची वाढवायची असेल तर खनिज युक्त पदार्थांचे सेवन करा उदा. पालक, हिरवी कडधान्य, कोबी, भोपळा, गाजर, डाळ, शेंगदाणे, केळी, द्राक्ष, फ्लॉवर, यांचा आहारात वापर करा.

स्वास्थ वर्धक आणि पोषक आहार केल्याने त्यात उपलब्ध असलेले विटामीन्स, प्रथिने, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तत्व उंची वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून पोष्टिक आहार करा. कार्बोनेट युक्त पेय, तसेच जास्त गोड खाऊ नका. दुध, फळांचा रस, गाजर, सफरचंद, केळी, मासे, चिकन, अंडी, सोयाबीन, कडधान्य आणि हिरव्या भाज्या यांचे जास्त सेवन करा. तसेच बदाम, शेंगदाणे, इतर नट्स हे आपल्यासाठी फायदेमंद ठरतील. विटामीन A हे आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहे, विटामीन A युक्त पदार्थाचे सेवन करा यामुळे आपली हाडे मजबूत होतील व आपली उंची वाढायला मदत होईल उदा. पालक, बीट, गाजर, दुध, टोमॅटो , यांचे सेवन करा तसेच यांचा रस काढून याचे सेवन करा. यामुळे आपल्याला फायदा होईल.

उंची वाढवण्यासाठी योगासन करणे खूप महत्वपूर्ण आहे.

उंची वाढवण्यासाठी योगासन हे सगळ्यात उपयोगी आणि सोपा उपाय आहे आणि योगा मध्ये काही अशी आसन आहेत जी आपली उंची वाढवायला मदत करतात. ताडासन हा योग प्रकार केल्यामुळे आपली उंची वाढायला मदत होईल. छोटे मूल व मुली तसेच किशोरवयातील मूल व मुली यांनी नियमित पणे ताडासनाच अभ्यास केल्यामुळे त्यांची उंची वाढण्यास मदत होईल. ताडासन करण्यासाठी उभे राहून दोन्ही हाथ वरती करून सरळ उभे रहा आणि मोठा श्वास घ्या आणि हळू हळू टाचा आणि हात वर उचलत जा. टाचा पूर्ण उचल्यावर शरीराला ताण द्या आणि परत मोठा श्वास घ्या. ताडासन केल्याने स्नायू सक्रीय होऊन विस्तृत होतात म्हणून ताडासन उंची वाढवण्या साठी फायदेमंद आहे.

त्याच प्रमाणे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांच्या कडे लक्ष दिल्याने आपल्याला फायदा होईल, बसताना  पोक काढून बसू नका, ताठ बसा, चालताना देखील ताठ चाला, योग्य झोप हि आरोग्यदाई जीवना साठी व आपल्या शरीराच्या विकासासाठी उपयोगी आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम तसेच योगा करा, चालण्याचा व्यायाम करा, योग्य झोप घेतल्याने शरीरात उतकांचा विकास व नवीन उतक निर्माण होतात आणि त्याचबरोबर पर्याप्त झोप घेतल्याने उंचीला नियत्रीत करणारे हार्मोन्सची वाढ होते. हे साधे व सोपे उपाय करून आपण उंची वाढू शकतो.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

टीबी रोगाचे लक्षणे – Tuberculosis symptoms

टीबी रोगाची लक्षणे आजकाल वातावरण खूपच प्रदूषित झाले आहे, त्यामुळे लोकांना विविध आजारांनि ग्रासल आहे, टीबी हा त्यातलाच आजार आहे, टीबी हा अतिशय गंभीर आजार आहे. टीबी चे पूर्ण नाव TB (Tuberculosis) आहे टीबी या आजाराला बळी पडणारे रुग्ण सर्वात जास्त भारतात आढळतात, भारतात दर वर्षी जवळ जवळ ४ लाख लोकांचा टीबी मुळे मृतू होतो. म्हणून टीबी ची लक्षणे जाणून घेणे आवशक आहे. आपल्याकडे एक गैरसमज आहे कि टीबी हा रोग अनुवांशिक आहे पण टीबी हा रोग अनुवांशिक नाही टीबी हा कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. म्हणून या आजारावर त्वरित व योग्य ते उपचार घेणे आवशक आहे. Medical Science च्या प्रगती मुळे टीबी हा रोग पूर्ण पणे बरा होऊ शकतो.

टीबी रोगाचे लक्षणे  TB (Tuberculosis)

टीबी ची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे, जर आपल्याला टीबी ची लक्षणे आधीच माहीत असतील तर आपण योग्य वेळेवर त्याचावर योग्य ते उपचार करू शकतो व टीबी या आजारापासून पूर्ण बरे होऊ शकतो. टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि हा रोग जीवाणूनमुळे होतो, हा रोग एका व्यक्तीपासून दुसरया व्यक्तीला होतो, हे जीवाणू शरीरात पसरून शरीराला कमजोर करता, हे जीवाणू सामान्यतः फुफुसा मध्ये आढळतात.

टीबी हा रोग फक्त फुफ्फुसांना नाही तर पूर्ण शरीरातील अंगाना हळू हळू प्रभावीत करतो, म्हणजेच आतडी, त्वचा, हाड, मूत्रपिंड, हृदय, हे सर्व अंग संक्रमित होतात. हा आजार जास्त पसरल्याने रोग्याला वाचवणे कठीण जाते, म्हुणुन याची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.

टीबी या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे जास्त काळासाठी खोकला होणे, जर आपल्याला ३ आठवड्याहून अधिक काळ खोकला असेल तर हे टीबी चे सुरवातीचे लक्षण आहे, म्हणून खोकला झाल्यावर त्याची तपासणी करून घ्या. आणि दुसरा लक्षण म्हणजे टीबी च्या सुरवाती लक्षणाम्ध्ये कफ मध्ये रक्त येतो आणि रक्त येत असेल तर याच्याकडे गांभीर्याने बघीतले पाहिजेत व डॉक्टर च्या सल्याने त्वरित योग्य ते उपचार घेतले पाहिजेत.

 

टीबी रोगाची लक्षणे

जर कोणाला ताप येत असेल पण हा ताप फक्त संध्याकाळी येत असेल तर हे टीबी चे लक्षण आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टर कडे तपासणी करा, जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल हा दम्या सम्बन्धी असू शकतो परंतु हा त्रास भरपूर होत असेल आणि छातीत दुखत असेल तर हा टीबी चा प्रमुख लक्षण आहे. जर आपल्या छातीत जळजळ होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित योग्य ते डॉक्टरी सल्याने उपचार करून घ्या.

टीबी झाल्यावर किंवा शरीर या रोगाने संक्रमित झाल्याने आपल्याला कमी भूक लागते, व कोणतेही खाद्य पदार्थ  खाण्याची इच्छा होत नाही हा देखील एक लक्षण असू शकतो, भूक न लागल्याने शरीर कमजोर होते व मोठ्या प्रमाणात वजनात घट होते, टीबी मुळे सर्वात जास्त संक्रमण फुफ्फुसाम्ध्ये होते, रात्री झोपताना भरपूर घाम येणे हे देखील एक लक्षण आहे, हि लक्षणे ओळखून टीबी वर डॉक्टरी सल्याने योग्य तो उपचार करावा.

 

 

 

 

 

लांब सडक केसांसाठी घरगुती उपाय(Remedies For Long Hair)

प्रत्येक स्त्री ची अशी इच्छा असते कि आपले केस लांब व सुंदर असावेत, यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करतात. पण काही वेळा असे दिसून येते कि या उत्पादनांची विक्री कमी होते कारण या उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर केलेला असतो. यामुळे आपल्या केसांना नुकसान पोहचतो , म्हणून बऱ्याच स्त्रिया नैसर्गिकरीत्या बनवलेले उत्पादन वापरतात.

लांब केसांसाठी उपाय:- Remedies For Long Hair 

आता आपण जाणून घेऊयात कोणते घरगुती उपचार करून आपण आपले केस लांब, घनदाट तसेच सुंदर बनऊ शकतो. लांब केसांसाठी आयुर्वैदिक उपचार हे खूप आधीपासून आहेत, पण त्यांच्या बद्दल कोणाला जास्त माहिती नाही. तसेच कोणी या उपचारांचे महत्व जाणून घेत नसे व या उपायांकडे दुर्लक्ष करत असत पण आताच्या काळात सर्वजण या उपायाविषयी माहिती घेण्यास उत्सुक असतात.

आवळ्याचा उपयोग:- Uses Of Gooseberry (Amla)

आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते. आवळा हा केसांसाठी खूप फायदेमंद आहे, केसांची गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. साधारत:  महिला केसांच्या पोषणासाठी आवळ्याचा वापर करतात कारण यामध्ये Vitamin-C भरपूर प्रमाणात असत.

गरम (कोमट) तेलाचा वापर:- Uses Of Warm Oil

आपण कदाचितच कधी तरीच गरम (कोमट) तेलाचा वापर केला असेल, पण आपल्याला माहित नसेल केसांसाठी आवश्यक असलेले जरुरी पोषक तत्वे गरम (कोमट) तेलात भरपूर असतात. आयुर्वेदिक तेल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करून आपण केसांची मालिश करू शकता. हया तेलामुळे केसांच्या मुळांना आराम मिळण्यास मदत मिळते आणि केसांची गळती थांबवण्यासाठी हे उपयुक्त आहे.

मेथीचा वापर :- Uses of fenugreek

आपण मेथीचा पण वापर करू शकता. काही चमचे मेथीचे दाणे घ्या आणि गरम पाण्यात मिसळा आणि थोडे थंड झाल्यावर केसांमध्ये लावा व काही वेळाने केस धुऊन घ्या.

कोरफडीचा वापर :- Uses of aloe vera

केसांमध्ये आपण कोरफडीचा वापर करू शकता यामुळे आपले केस चमकदार होतात त्याच प्रमाणे केसांची गळती देखील थांबण्यास मदत मिळते.

लिंबाचे साल तसेच कडीपत्ता चा वापर :- Uses of Lemon and Curry leaf

आपण नेहमीच लिंबाचे साल फेकून देतो पण आपल्याला माहित नसेल लिंबाचे साल आपल्या केसांसाठी किती उपयोगी आहे.  लिंबाचे साल घ्या, त्या बरोबर १५ ते २० कडीपत्त्याची पाने, हिरवे चणे, आणि मेथीच्या बिया हे सगळ एकत्र करून वाटून घ्या आणि केसांमध्ये लावा व काही वेळाने केस धुऊन घ्या.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी कोरफडचे नैसर्गिक उपाय

डोक्यातील कोंडा, डोक्याच्या त्वचेला होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्याच्यामुळे केसांचे नुकसान होऊन केस कमजोर होऊन गळायला लागतात. जर डेंड्रफचा …

Read more