घश्यातील खवखव दूर करण्याचे उपचार-(Treatment on sore throat)

आपल्या शरीरात काही ना काही बदलाव होतात. हे बदलाव जास्त करून वातावरणात आलेल्या बदलावामुळे होतात जसे कि शरीर आजारग्रस्त करते, उदा. पोटा संबंधी आजार, सर्द्दी, खोकला, गळया संबंधी आजार इत्यादी आजार होतात. यात गळ्यात काटा रुतल्या सारखे दुखणे, खव खव, आवाज बसणे  इत्यादी समस्या होतात.

घश्याची खवखव दूर करण्यासाठी बरेच उपचार आहेत. बऱ्याच वेळा आपण अशा आजारांकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. असे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. ज्यांच्या मध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना असे आजार होतात, तसेच लहान मुलांना, ज्यांना एलर्जी लवकर होते त्यांना, जे लोक धुम्रपान करतात त्यांना अशा लोकांना घशा संबंधी आजार होतात.

गळ्यात खवखव होण्याची कारणे

आपल्या घश्यात दोन्ही बाजूला टॉन्सिल्स असतात जे किटाणू, जीवाणू तसेच व्हायरस ला आपल्या गळ्यात जाऊन देत नाही. पण बऱ्याच वेळा हे टॉन्सिल्स संक्रमित होतात याला टॉन्सिलाईटीस म्हणतात. यामुळे घश्यातील दोन्ही बाजूचे टॉन्सिल्स गुलाबी व लाल रंगाचे दिसतात. हे थोडे मोठे व लाल होतात, काही वेळा याच्यावर सफेद रंगाचे ठिपके दिसतात. घश्याचे इन्फेक्शन जास्त करून व्हायरस व  bacteriya मुळे होतो. घश्यामध्ये खवखव हि सगळ्यानाच कधी ना कधी होते, खवखव झाल्याने घश्यात दुखणे, काहीतरी टोचल्या सारखे वाटणे, अन्न गिळायला त्रास होणे, घशाला कोरड पडते. टॉन्सिलाईटीस चे संक्रमण हे योग्य देखभाल आणि एन्टीबायोटीक औषध घेतल्याने बरे होत. पण याचा त्रास जेंव्हा वाढतो diphtheria नामक आजारामुळे अजून समस्या वाढते. याच्यावर काही घरगुती उपचार आहेत.

जेव्हा हे संक्रमण स्तेरपटोकोकस हिमोलीटीस नामक bacteriya मुळे होतो. तेंव्हा हा संक्रमण हृदय आणि किडणीत पसरू लागतो तेंव्हा  धोकादायक आजार होऊ शकतो. व्हूपिंग कफ (whooping cough) च्या मुळे  घश्यात खवखव व डांग्या खोकला होउ शकतो. जो बराच काळ राहू शकतो. तसेच न्युक्लोसीस नावाच्या व्हायरस मुळे घश्यात खवखव होते. ह्या आजाराचे लक्षण घश्यात खवखव याच्या व्यतिरिक्त ताप येणे, डोकेदुखी, अशक्तपणा येऊ शकतो. सार्वजनीक ठिकाणी असे आजार जास्त करून होतात आणि त्याच्या मुळे  घश्यात खव खव, ताप, मांसपेशींमध्ये वेदना, सर्द्दी आणि तोंडात सफेद डाग होऊ शकतात.

घरगुती उपचार

जर घश्यात आपल्याला जळण होत असेल किंवा सारखा खोकला होत असेल तर साध्या पाण्याने गरारा करा. जर याच्याने फरक पडत नसेल तर पाण्यात मीठ टाकून थोडा उकळून घेऊन व हे पाणी कोमट झाल्यावर याने गरारे करा. अशावेळी कोणतेही थंड पदार्थ व थंड पेय घेऊ नका. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. असे करून देखील फरक पडत नसेल तर एक कप पाण्यात ४ -५ काळी मिरी आणि तुळशी ची पाने टाकून त्याचा काढा बनवा आणि हे हळू हळू प्या आणि असे आपण दिवसातून २ – ३ वेळा केलेत तर आपल्याला आराम मिळेल, आपला ताप हि जाईल व आणि कफ तयार नाही होणार.

जर कोणाला ताप येत असेल आणि घश्यात बऱ्याच दिवसान पासून खवखव होत असेल तर आल, वेलची आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी ह्या चहा चे सेवन केलेत तर आपल्याला खूप आराम मिळेल. त्याच बरोबर यात जीवाणूरोधक गुण असतात. हा चहा पिल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

vinegar ला एक उपयोगी औषध मानले जाते. कोमट पाण्यामध्ये vinegar मिसळून त्या पाण्याने गरारे केल्याने घश्याचे आजार दूर होतात. काळी मिरी आणि २ बदाम यांचा चूर्ण बनउन याचे सेवन केल्याने गळ्याचे रोग बरे होतात. अर्धा ग्राम तुरटी कमीत कमी एक मिनीटान पर्यंत तोंडात ठेवा आणि त्याचा रस प्या, यामुळे घश्याची खवखव दूर होईल. जर असे आपण दोन तीन वेळा करत असाल तर २ – ३ तासातच आपला घसा साफ होईल, आणि कफ जाईल. असे केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने बडीसोप खा, असे सकाळी केल्याने आपल्याला आराम मिळेल. महत्वाचे म्हणजे अशा वेळी धूम्रपान करू नका आणि तिखट व तेलकट तसेच थंडगार पदार्थाचे सेवन करू नका.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

 

घरी प्रेग्नन्सी (गर्भवती) टेस्ट कशी करावी-(How To Test A Pregnancy At Home)

होम प्रेग्नन्सी कीट महिलांच्या मूत्र मधील हार्मोन HCG (human chorionic gonadotropin) उपस्थीती शोधून काम करतो. ह्यामुळे हे माहित होते की महिला गर्भवती आहे की नाही आणि गर्भवती असल्याचे समजण्याचे कारण HCG हार्मोन असतात. होम प्रेग्नन्सी कीट हे मेडिकल मध्ये उपलब्ध असते.

घरी प्रेग्नेन्सी टेस्ट कशी करावी

याचा वापर कसा करावा? पहिले आपण होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट विकत घ्या आणि हे विकत घेण्या आधी काही गोष्टींकडे  लक्ष द्या, कारण बाजारात बऱ्याच कंपनींचे होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट उपलब्ध आहेत. घेतान त्याची कालबाह्य तारीख  (एक्सपायरी डेट) जरुर चेक करा. हे कीट चालतेय कि नाही हे चेक करून घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर अशी कंपनी निवडा जी कीट मध्ये दोन स्टिक्स उपलब्ध करत असेल. जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात परिणाम नकारत्मक आले असतील तर एक आठवडा वाट बघून पुन्हा प्रयत्न करा.

काही कंपनींचे होम प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आपली मासिक पाळी न येणाऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधी गर्भावस्थेची एकदम ठीक स्थिती सांगण्याचा दावा करतात. पण हे बरोबर आहे कारण याची पडताळणी एवढी संवेदनशील असते कि आपल्या मूत्रातील उपस्थित HCG हार्मोन च्या उच्च स्तराचा शोध लावतो, परंतु आपल्या शरीरात उच्च स्तरा वर ह्या हार्मोन चे निर्माण साठी अधीक वेळ लागू शकतो, अश्या वेळी टेस्ट नकारात्मक परिणाम दाखवू शकतो. पण कदाचित आपण गर्भवती असू शकता म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करा आणि घाबरू नका हे कोणत्याही महिले सोबत होऊ शकते.

जर आपण टेस्ट करत असाल तर आपण त्या टेस्ट ची वेळ जाणून घ्या म्हणजेच टेस्ट केंव्हा आणि कोणत्या प्रकारे करायची आहे. जास्त करून विशेष गर्भावस्थाच्या टेस्ट साठी मासिक पाळी होत नसेल तर एक दिवस वाट बघण्याचा सल्ला देतात, तसेच एक आठवडा वाट बघणे हे आपल्या साठी चांगले होईल. जर आपण गर्भावस्थे बद्दल जाणून घेण्यासाठी अनिश्चित असाल तर हे कठीण होऊ शकत. पण वाट बघितल्याने आपली टेस्ट अधिक अचूक होण्याची संभावना वाढते कारण गर्भावस्तेत महिलां मध्ये HCG हार्मोन चा स्थर वेगाने वाढू लागतो यामुळे हे आपल्या साठी सोपे जाईल व आपण घरी प्रेग्नेन्सी टेस्ट करू शकता.

प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळ आहे कारण यावेळी लघवी जाड असते किंवा सकेंद्रित असते. यामुळे प्रेगनन्सी ची टेस्ट करणे सोपे जाते आणि यामुळे आपला परिणाम अचूक येतो. जर आपण पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा, जास्तकरून लघवी तपासणी एक सारखीच असते पण त्याच्यावर दिलेल्या सूचन नीट वाचल्या पाहिजेत. प्रत्येक गर्भावस्था तपासणीची विवरण जसे लघवी एकत्र करणे, नंतर आपण लघवी त्या स्टिक वर टाकाल  आणि त्या नंतर आपण गर्भवती आहात कि नाही ते समजेल अशा तरेने आपल्याला समजेल आपण गर्भवती आहात कि नाही.

खूप वेळा असे बघण्यात आले आहे कि जास्त करून महिला हि टेस्ट करायला घाबरतात त्यामुळे आपण पहिले हे सुनिश्चित करा की आपल्याला हि टेस्ट करायची आहे की नाही. प्रेग्नेन्सी टेस्ट करणे हा एक रोचक अनुभव असतो म्हणून अशा वेळी घाबरायचे नाही, आपल्या जरुरती नुसार वेळ काढून हि टेस्ट करा. कोणतीही घाई करू नका. यात आपण आपल्या मैत्रिणीची मदत घेऊ शकता. कोमट पाण्याने आणि साबणाने आपले हात स्वच्छ धुऊन घ्या आणि होम प्रेग्नेन्सी कीट वर दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रेग्नेन्सी टेस्ट करा.

हि टेस्ट करताना कोणतीही घाई करू नका, सावकाश करा. या टेस्ट मध्ये साधारणत: १ ते ५ मिनिटांचा अवधी लागतो. पण योग्य परिणाम साठी १० मिनिटांचा अवधी देखील लागू शकतो.

पण कोणत्याही तपासणी च्या आधी त्याच्यावरील सूचना नीट वाचल्या पाहिजेत आणि हि टेस्ट करताना स्वतःला वेळ द्या आणि कोणतीही घाई गडबड करू नये. घाबरून जाऊ नका, मन विचलित होऊन देऊ नका. जास्तकरून प्रेग्नन्सी तपासणीत त्या स्टिक वर अधीक व वजा चे चिन्ह असतात. कोड केलेला रंग, प्रेग्नेंट व नॉन प्रेग्नेंट अश्या सूचना त्याच्यावर दिलेल्या असतात.

जर इशारा खूप हलका दाखवत असेल तर आपल्याला तो हि आपण सकारात्मक प्रकारे घेतला पाहिजे कारण आपल्या लघवीत उपस्तीत HCG तपासणीत सापडला आहे आणि थोडासा हलका हार्मोन आपल्या लघवीत सापडला असेल तर आपण प्रेग्नेंट आहोत असे समजा. जर आपला परिणाम positive असेल तर सुनिश्चित करण्या साठी आपण डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. साधारत: रक्ताची तपासणी करून हे केले जाते आणि जर परिणाम negative असेल तर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.

जर आपण तपासणी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या आधी जास्त तरल पदार्थ पिऊ नका. कारण यामुळे लघवी पातळ होईल आणि आपल्याला योग्य परिणाम मिळणार नाही. आणखीन काही लक्षणे म्हणजे आपली मासिक पाळी चुकणे, वजन वाढणे, कोरड्या उलट्या होणे अशी काही लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टर चा सल्ला घ्यावा. कारण अशावेळी डॉक्टर चा सल्ला घेणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

गर्भावस्थेत दुसऱ्या महिन्यात काय खावे व काय खाऊ नये-(What to eat and what not to eat during second trimester of pregnancy)

गर्भावस्थेत खाण्या पिण्याबद्दल खूप काही बोलले जाते कारण, गर्भ धारण केलेली स्त्री जो भोजन खाते त्यामुळे बाळाचे संगोपन होते. जर स्त्री चे खानपान ठीक असेल तर तिचा शिशु पण निरोगी राहतो. बऱ्याचदा विचारले जाते गर्भावस्थेत काय खाल्ले पाहिजे व काय नाही खाल्ले पाहिजे तसेच कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे.

गर्भवती झाल्यावर गर्भावस्था पाचव्या आठवड्यात सुरु होते आणि खूप साऱ्या महिला अश्या असतात ज्यांच्यात गर्भावस्थेची लक्षणे पहिल्या महिन्यात दिसू लागतात. अशा वेळी आहार सगळ्यात महत्वपूर्ण आहे कारण यामुळेच आपला होणारा बाळ तंदुरुस्त होतो. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे, तिसऱ्या महिन्यात काय खाल्ले पाहिजे? ह्या काळात आजारी पडल्यासारखे वाटते ज्यामुळे आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही पण तरी देखील आपल्याला पोषक आहार घेतला पाहिजे.

किवी चे फायदे  यावेळी किवी हा फळ रोज खाल्ला पाहिजे. अशा वेळी किवी चे  खूप महत्व आहे. यावेळी बाळाची न्यूरल ट्यूब (मज्जासंथा) विकसित व्हयाला सुरुवात होते आणि नंतर बाळाच डोक, पाठीचा कणा आणि तंत्रीकांचा विकास होऊ लागतो. तसेच गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात होणारा परिवर्तन याच्या सोबत बाळाचा संचार तंत्र आणि हृदय विकसित होतात. म्हणून गर्भधारणेच्या दुसऱ्या आठवड्यात आहार खूप महत्वाचा असतो. यावेळी आहाराकडे विशेष लक्ष दिला पाहिजे.

गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसात काय खाल्ले पाहिजे? आपल्याला फोलिक ऍसिड किंवा फॉलेट जे एक व्हिटामिन बी आहे हे गर्भवती महिलेस खूप फायदेमंद आहे आणि गर्भधारणेच्या सुरवातीच्या आठवड्यात फोलिक ऍसिड घेणे खूप आवश्यक आहे. कारण हे न्यूरल ट्यूब विकसित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. जर आपण फोलिक ऍसिड घेत नसाल तर न्यूरल ट्यूब योग्य प्रकारे विकसित होत नाही किंवा बाळ वेळेच्या आधीच जन्माला येतो. यामुळे आपल्याला व बाळाच्या जीवाला धोका असतो.

गर्भावस्थेत आहार कसा असावा

गर्भवती महिलेला आपल्या शरीरात आयन  ची कमी होऊन न देणे महत्वाचे आहे, कारण आपली रक्त पुरवठा करणारी यंत्रणा बाळा पर्यंत पण रक्त संचार करते. जर आपण आयन  ठीक घेत नसाल तर आपल्याला थकल्या सारखे वाटेल आणि अशक्तपणा पण येईल. आपल्याला जेंव्हा समजेल कि आपण गर्भवती आहोत तेंव्हा पासुन रोज २७ मिलीग्राम आयन घ्यायला सुरवात करा आणि अशा फळांचा सेवन करा ज्याच्यात सगळ्यात जास्त आयन असते. गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात बाळाचा विकास सुरु होतो.  

कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी मदत कारतो. जर शरीरात कॅल्शियम ची मात्रा कमी असेल तर हाडांसंबंधी आजार होतात आणि दुसऱ्या महिन्यात बाळाच्या हाडांचा विकास सुरु होतो. यामुळे शरीरात कॅल्शियम ची मात्रा वाढवणे खूप आवश्यक आहे. यासाठी रोज १००० मिलीग्राम कॅल्शियम घेणे आवश्यक आहे. यासाठी दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा सेवन जास्त करा. आणि दुग्ध पदार्थान सोबत पालेभाज्यांचा सेवन जास्तीत जास्त करा. जर आपण कॅल्शियम चा सेवन नाही करत तर आपला शरीर आपल्या हाडांन मधून कॅल्शियम घ्यायला सुरवात करतो. ज्यामुळे हाड कमजोर होतात आणि यामुळे आपल्या हाडांन मध्ये आणि सांध्या मध्ये वेदना होतात. त्यामुळे कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.

प्रोटीन आपल्या शरीराला ऊर्जा देण्याच काम करतात आणि प्रोटीन युक्त भोजन केल्याने शरीर मजबूत आणि निरोगी बनतो. यामुळे गर्भवती महिलेला सगळ्यात जास्त आपल्या आहारात प्रोटीन घेतले पाहिजेत आणि प्रोटीन युक्त भाज्या व फळांच सेवन केल पाहिजे, कारण प्रोटीन मुळे शरीर मजबूत बनतो आणि आपला बाळ देखील निरोगी राहतो तसेच मांसपेशीच्या विकासात मदत होते. प्रोटीन मुळे बाळापर्यंत आवश्यक रक्त पुरवठा होतो अशावेळी आपले वजन देखील वाढते म्हणून कमी fat वाला पनीर आणि मासे खा कारण यामध्ये अधिक प्रोटीन असतात आणि आपल्याला रोज ७५ ते १०० ग्राम प्रोटीन चा सेवन करायला हवा.

मिट स्प्रेड लीस्तीरिया हे लाल मास गर्भावस्थेत बिलकुल खायला नाही पाहिजे कारण यामुळे आपल्या बाळावर वाईट परिणाम होतात आणि मास किंव्हा  लाल मास खाल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यामुळे या दिवसात मास खाणे टाळले पाहिजे. सोबत चीज ब्री व  चीज चे सेवन करू नका कारण याच्यात ई कोलाय bacteria असतो यांच्या सेवनाने इन्फेक्शन किंवा अन्य जटीलतनचा धोका असतो. यावेळी आयर्न ची कमी पूर्ण करण्यासाठी आपण लिव्हर चा सेवन करू शकता पण याच जास्त सेवन करू नका कारण यामध्ये रेटीनल असते यामुळे गर्भपात चा धोका असतो.

आपल्याला माहितच असेल दारू चे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि अशावेळी दारू चे सेवन करू नये. अंडी खाणे ठीक असते आणि फायदेमंद असते पण कच्चे अंडे आणि अर्धवट शिजलेली अंडी खाल्याने आपल्याला नुकसान होऊ शकतो. म्हणून याचा सेवन करू नका. अंडी उकडून खा आणि जास्त अंडी खाऊ नका, दिवसातून जास्तीत जास्त दोन आणि गर्भावस्थेत आपल्या आहार बद्दल डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! 

गर्भ निरोधक गोळ्यांचा रहस्य-(Mystery of Contraceptive Pills)

विदेशी कंपन्या आपल्या देशात गर्भ निरोधक उपाय विकतात आणि हे गोळ्यांच्या रूपाने विकले जाते उदा. Norplant, Depo -Provera, I-pill, E – pill. यापैकी काही खूप धोकादायक आहेत. या गोळ्यांच्या सेवनाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्याला कदाचित माहित नसेल आपण ज्या औषधांचा वापर करत आहोत ह्या गोळ्याचा वापर या कंपन्या आपल्या स्वतःच्या देशात करत नाही, या केवळ आपल्या देश्यात विकल्या जातात. Depo –Provera हे  एक तंत्र विकसित औषध आहे. हे एका अमेरिकन कंपनी ने विकसित केले आहे, कंपनीचे नाव अब्जोन आहे. या कंपनीला अमेरिकन सरकार ने बंद केल आहे.

हे इंजेक्शन च्या रुपात भारतात विकले जात आहे. हा इंजेक्शन मासिक धर्म पूर्णपणे बिगडून टाकतो आणि शेवटी गर्भाशय मध्ये कॅन्सर होतो. यामुळे मृत्यू हि होऊ शकतो. NET- EN नावाच नवीन तंत्र विकसित केल आहे. स्टेरॉंईड च्या रुपात स्त्रियांना दिला जातो, नाहीतर कधी इंजेक्शन च्या रुपात दिला जातो यामुळे गर्भपात होतो आणि यामुळे पियुष ग्रंथी हार्मोन मध्ये असंतुलन येत आणि यामुळे खूप त्रास होतो.

याच प्रकारे RU-496 अजून एक तंत्र आणि रूसल नावाची अजून एक तंत्र आहे. तसेच UKLF व नॉंर कंपनी आहे त्यांनी एक प्रजनन डोस बनवला आहे. गर्भ निरोधकांमुळे युरेटस च्या मांसपेशी लूज होतात आणि मासिक पाळीच्या वेळी यांच्या वापराने अनेक स्त्रिया बेशुद्ध होतात. पण त्याना हे माहित नसते कि त्यांना contraceptive नावाचे एक प्रकारे विष दिले जात आहे, आणि दर वर्षी हजारो करोडो रुपयांची लूट विदेशी कंपन्या गर्भ निरोधक च्या नावाने करतात.

याच्या व्यतिरिक्त विदेशी कंपन्यांचा कंडोम चा व्यापार खूप वाढला आहे. कंडोम चा प्रचार करणे खूप आवश्यक आहे कारण या मुळे एड्स सारख्या आजारावर आळा बसतो. एड्स हे फक्त एक कारण आहे आपल्या मालाची विक्री  करण्याची. वृत्तपत्र आणि मासिक मध्ये या कंपन्या एकच सांगतात कि कंडोम चा वापर करा पण हे नाही सांगत कि स्वतः वर कंट्रोल करा, हे नाही सांगत पती आणि पत्नी ने एक मेकांना धोका देऊ नका. त्याच्यात एवढेच सांगतात कि कंडोम चा उपयोग करा. एकट्या भारतामध्ये १०० करोड हून अधिक कंडोम विकले जातात. फक्त पैसे कमवने हाच या कंपन्यांचा हेतू आहे, एड्स च्या नावाने या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कंडोम ची मोठी बाजारपेठ उभारली आहे आणि शकडो करोडो रुपये कमवतात. परंतु एड्स हा एक घातक आजार आहे. लोकांना फक्त एड्स च एकच कारण माहित असते. एड्स हा फक्त यौन संसर्गातून होतो असे नाही दुसरे हि कारणे आहेत त्यामुळे देखील एड्स होतो. एड्स ग्रस्त रुग्णाला दिलेले इंजेक्शन दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्यास एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस हि होतो, एड्स च्या रोग्याचे रक्त दुसऱ्या निरोगी व्यक्तीस दिल्याने एड्स हा रोग त्या निरोगी व्यक्तीस होतो. पण बहुराष्ट्री कंपन्या असा दावा करतात कि एड्स हा आजार फक्त कंडोम च्या वापराने आटोक्यात येईल. डॉक्टर ओकलीग्स च्या अनुसार चुकीच्या यौन संपर्कातून ०.११ %, इंफेक्टेड इंजेक्शन मुळे  ०.५० %, एड्स ने बाधित रक्त निरोगी व्यक्तीस दिल्याने ०.9 % एड्स होण्याची संभावना असते. एड्स ने संक्रमित व्यक्ती किंवा महिलेशी संभोग तसेच एड्स ने इंफेक्टेड सुईचा वापर आणि एड्स ने इंफेक्टेड रक्त चढवल्याने एड्स होण्याची संभावना सारखीच असते.

विलासी उपभोक्तावादि संस्कृतीच्या काळात कंडोम संस्कृती आणि त्यावर विवाहोतर यौन संबंधाना वाढवून एड्स सारखा आजार आणखीन वाढेल, आपल्या देशात जवळ जवळ दररोज ४० करोड रुपयाचा कंडोम देशी कंपन्या आणि एवढाच विदेशी कंपन्या विकत आहेत. २५ ते ३० एजन्सीज जपान, कोरिया, तैवान, थायलंड या देशांतून  कंडोम मागवून विकत आहेत. आपल्या देशात २० देशी व ८० विदेशी कंपन्या १०० करोड हून अधिक कंडोम विकत आहेत.

मुक्त यौन संस्कृती आणि त्याला कंडोम द्वारा सुरक्षा कवच घालून प्रचारित करून युवांच्या उर्जेचा प्रवाह कोणत्या दिशेस फिरवला आहे. सरकार आणि विदेशी कंपन्या एड्स च्या नावाने कंडोम ची विक्री वाढवायच्या मागावर आहे. या साठी तरुणांना आकर्षित करत आहे. विवाहाच्या आधी यौन संबंध प्रस्थापित करावेत, ज्यामुळे परिवार आणि समाज नष्ट होईल, यामुळे भारतीय संस्कृती नष्ट होऊन वीदेशी संस्कृती येईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

कुत्रा चावल्या नंतरचे उपचार-(Treatment on dog bites)

बऱ्याच लोकांना पाळीव प्राणी पाळायला आवडते. कुत्रा, मांजर, घोडे किंवा पक्षी पाळतात. पण काही प्राण्यांच्या चावण्याने आजार होतात. विशेषतः कुत्राच्या चावण्याने खूप गंभीर आजार होतो. वेळीच उपचार नाही केले तर आपल्या जिवाला धोका हि पोचू शकतो. डॉक्टरांच्या नुसार कुत्रा चावल्यावर आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे.

कुत्राने चावलेल्या जागेवर कोणत्या हि प्रकारचा कापड किंवा पेपर बांधू नये. तो घाव तसाच उघडा ठेवा. जखम साबणाने धुऊन घेतली पाहिजे. जर आपल्या घरात अल्कोहोल असेल तर तो एक एन्टीसेप्टिक म्हणून कार्य करते, अलकोहोल आपल्या जखमेवर टाका. आणि डॉक्टर ला दाखवा व इन्फेक्शन (संसर्ग) पासून वाचण्या साठी इंजेक्शन घेणे जरुरी आहे. जर कुत्रा पिसाळलेला असेल किंवा त्याला इतर रोग झाला असेल तर ते  आपल्या जिवावर बेतू शकते म्हणून त्वरित डॉक्टर कडे जाऊन उपचार घ्यावेत.

रेबीज एक खूप गंभीर आणि धोकादायक वायरस आहे आणि ज्याच्या मुळे खूप घातक आणि जिवघेणा आजार होतो आणि हा आजार जास्त करून कुत्र्याच्या चावण्याने होतो. जर कुत्र्याला किंवा इतर प्राण्याला रेबीज असेल आणि जर तो कुत्रा माणसाच्या चावला तर कुत्र्याच्या लाळे द्व्यारे रेबीज माणसाच्या शरीरात पसरतो.  रेबीज हा जास्तकरून मासांहारी प्राण्याच्या चावण्याने पसरतो. अजून हि काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यामुळे रेबीज होतो उदा. कोल्हा, चित्ता, लांडगा, कुत्रा इत्यादी प्राण्यांमुळे पसरतो आणि जंगला मध्ये बरचसे प्राणी या आजाराने मरतात.

हा वायसर मेंदू मध्ये घुसतो आणि हा मेंदू मध्ये तांत्रिकांच्या माध्यमातून घुसतो, रक्ता मधून नाही. कुत्रा चावल्या नंतर लाळे द्वारे वायरस जखमेत येतो. आणि वायरस स्थानीय तांत्रिक तंतू मध्ये पोचतो. इथून सगळ्या तंत्रिकां मधून मेरुदंड आणि मेंदूत प्रवेश करतो, रेबीज तंत्रिकां मधून पसरतो. जर ज्या ठिकाणी कुत्रा चावलेला असेल तिथून तांत्रिका जेवढी लांब असेल तेवढा हळू वायरस मेंदूपर्यंत पसरतो. यामुळे आपल्याला उपचार करण्यासाठी जास्त वेळ मिळतो.

रेबीज ची लक्षणे

चावल्याच्या ठिकाणी वेदना होणे, त्या ठिकाणी हलकी संवेदनहीनता होणे आणी कधी कधी खाज सुटणे, ताप येणे, बाधित मांसपेशी आखडणे. हे काही प्राथमिक लक्षणे आहेत. रेबीज मुळे पुढे बेशुद्धपणा, भुरकट दिसणे, पाणी प्यायला भीती वाटे, हिंसात्मक होणे अशी काही लक्षणे दिसून येतात आणि या रोगाला अलर्क हि म्हणतात.

कुत्र्याच्या चावण्याने पेशण्टला एन्टी सिरम इंजेक्शन दिला जातो. या आजारावर कोणताही एन्टीबायोटीक नाही म्हणून एन्टी सिरम इंजेक्शन घेणे जरुरी आहे. कारण हा रेबीज च्या वायरसला नष्ट करायला मदत करतो पण हे खूप महाग औषध आहे, आयुर्वेदात हि कुत्राच्या चावण्यावर उपचार आहेत जे कमी खर्चिक आहेत.

आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी चिंचेच्या बिया घ्या आणि लसणाच्या काही पाकळ्या घ्या. चिंचेच्या बिया साफ करून त्याचा वरचा साल काढून घ्या आणि या बिया लसणा सोबत वाटून घ्या आणि हा लेप जखमेवर लावा.  काही वेळ हा लेप असेच ठेवा. जास्तीत जास्त विटामिन सी युक्त आहाराचे सेवन करा कारण यामुळे संक्रमणा सोबत लढण्यास सहायता मिळते. तसेच यामुळे शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

सर्वात प्रथम घाव स्वच्छ धुऊन घ्या आणि पेशण्टला Hydorfobinium 200 औषध द्या आणि हे औषध पूर्णतः होमिओपॅथी आहे. हे औषध आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळेल. आणि हे औषध कसे वापरावे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. हे औषध ज्या व्यक्तिला कुत्रा चावला आहे त्याला दर १० मिनिटांनी ३ – ३ थेंब  पाजले पाहिजे. याच्या वापराने रोगी ठीक होईल.

हा आजार रेबीजच्या कुत्राने चावल्यावर पसरतो किंवा पिसाळलेला कुत्रा चावल्यावर पसरतो. जर कुत्रा चावला असेल तर त्वरित डॉक्टर कडे जावे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

कावीळवर घरगुती उपचार-(Home Remedies on Jaundice)

कावीळ एक गंभीर आजार आहे. कावीळ हा लिव्हर च्या संबंधित आजार आहे. या आजारात रोग्याचे डोळे व शरीराचा रंग पिवळा पडतो, अजूनकाही बदलाव शरीरात होतात. जसे नखांचा रंग पिवळा होणे, लघवी पिवळी होणे. कावीळ हा साधारण आजार वाटतो पण कावीळवर लवकर उपचार नाही केले तर याचे गंभीर आजारात रुपांतर होते. ज्यामुळे रोग्याच्या जीवाला धोका पोचू शकतो. याच्यावर योग्य उपाय केले नाही तर हा एक खूप धोकादायक आजार ठरतो.

हा आजार शरीरातील रक्तात पित्ताची मात्रा अधिक मात्रेत वाढल्यामुळे होतो. रक्तात पित्तरस बिलरुबिन ची मात्रा वाढल्याने होतो. शरीरात पित्ताचे निर्माण यकृतात होतो. पित्त आपण जे भोजन खातो ते पचवण्याच्या हेतू, तसेच शरीराच्या पोषणासाठी खूप आवश्यक असतो. आपण केलेला भोजन शरीरात कुजण्यापासून रोखण्याचे काम करतो. याच्यामुळेच आपली पचन क्रिया चांगली राहते. जर असे होत नसेल तर कावीळ ने ग्रस्त झालो आहोत समजावे.

कावीळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि कावीळ मुख्यतः तीन प्रकारची असते. पहिली हेमोलाईटीक जॉन्डीस : या मध्ये रक्तातील लालरक्त कणिका नष्ट झाल्यामुळे शरीरात बिलरुबीन वाढतो ज्यामुळे शरीरात रक्ताची कमी होते आणि कावीळ होते. दुसरा प्रकार : शरीरातील बिलरुबीन ड्यूडेनम मध्ये रक्त जाण्यास रोकतो ज्यामुळे कावीळ होते. तिसऱ्या प्रकारात कावीळ लिव्हरच्या सेल्स ला विषाणू संक्रमण ने नुकसान झाल्यामुळे होते.

कावीळीचे अनेक लक्षणे आहेत जसे डोळ्यांच्या रंग पिवळा होणे, अशक्तपण येणे, सतत ताप येणे, उलटी होणे, अंगदुखी, भूक न लागणे, लघवी पिवळी होणे, नखांचा रंग पिवळा होणे, मळमळने, बध्कोष्टता इत्यादी लक्षणे आहेत. कावीळ जास्तकरून वृद्धांना होतो. यामध्ये त्वचेवर जोरदार खाज सुटते.

कावीळीच्या रोग्याने कमीत कमी २ हिरव्या नारळांचा पाणी प्यावा. नारळ फोडल्यानंतर नारळाचे पाणी त्वरित प्यावे. असे केल्याने आपल्या लघवीचा रंग एका दिवसातच बदलेले. असे ४ – ५ दिवस केल्याने आपल्याला फरक जाणवेल.

कावीळीवर उपचार करण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जास्तच वाढला असेल तर आराम करणे आवश्यक आहे. कावीळ झाल्यावर आहारात बदल करणे आवश्यक आहे. तसेच पथ्य पाळावे लागतात. कावीळ झाल्यावर संत्रा, लिंबू, नाशपाती, द्राक्ष, गाजर, बीट, उसाचा रस हे आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

कावीळ झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. शुद्ध पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात. सगळे वासयुक्त पदार्थ जसे तूप, तेल, मक्खन, मलई कमीत कमी २५ दिवसांपार्यत खाऊ नका. तिखट खाण्याचे टाळा, मांस खाण्याचे टाळावे, जैतून च्या तेलाचा उपयोग करू शकता. आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा रस प्या. यामुळे आपल्याला पोषक तत्व मिळतात.

पित्त हा आपण केलेला आहार पचवण्यासाठी जरुरी आहे. पित्त आपण केलेला आहार आतड्यानमध्ये कुजून देत नाही. जर पित्त योग्य तरेने आतड्यात पोचत नसेल तर ग्यास (आंबटपणा ) सारखी समस्या होते आणि शरीरात विषारी तत्व एकत्र होतात.  मुळा च्या पानांचा रस चे सेवन देखील फायदेमंद ठरते. आपल्याला कावीळ झाली असेल तर आपल्या आहारात पर्याप्त मात्रेत प्रोटीन, विटामिन C, विटामिन B कॉम्प्लेक्स असावेत. पूर्णपणे स्वस्थ झाल्यावर देखील आपल्या आहारात निष्काळजी पणा करू नये. कारण योग्य व पोषक आहारामुळे आपण निरोगी राहतो.

आवळा हा कावीळ झाल्यावर खूप फायदेमंद ठरतो. ५० ग्राम आवळ्याचा रस, २ ते ३ मिलीग्राम तुळशीच्या रसा मध्ये मिळवा. आणि याच्या जूस बनवा आणि या जूस चे सेवन सकाळी लवकर करा. २ ते ३ दिवसात आपल्याला फरक जाणवेल. तसेच आपल्या पोटा संबंधी समस्या देखील दूर होतील. जर आपण सकाळी व संध्याकाळी उसाचा रसात लिंबू पिळून पीत असल तर आपल्याला फायदा होईल. कावीळ झाल्यावर दहीचे सेवन करणे फायदेमंद असते कारण कावीळ बरा करणारे चांगले bacteria दही मध्ये असतात.

दही आपल्या शरीराला डिटॉक्सीफाई करतो. टरबूज, केळा, अननस, संत्रा, मोसंबी या फळांचा सेवन जरुर करा आणि आहार नियंत्रित मात्रेत करा. कांदा देखील कावीळ झाल्यावर फायदेमंद आहे. कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिळवून किंवा कांद्यावर लिंबू पिळून सकाळी सलाड प्रमाणे सेवन करा. कावीळ चे लक्षण दूर होतात. धन्याचे १० ग्राम बिया रात्री पाण्यात भिवून ठेवा, सकाळी हा पाणी गाळून प्या या पाण्यामुळे लिव्हर मधील सारे टॉक्सिन्स दूर करेल व आपल्याला आराम मिळेल, त्याचप्रकारे बार्ली चा पाणी पण लिव्हरला डिटॉक्सीफाई करतो आणि कावीळ मध्ये आराम मिळतो. रोग्याला मुळा च्या पानांचा जूस चे सेवन करायला हवा. जर आपल्याला आराम मिळत नसेल तर डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

ऍलर्जी वर घरगुती उपचार-(Home remedies on allergy)

आपला शरीर खूप संवेदनशील असतो. आपल्या शरीरात काही खूप अतिसंवेदनशील अंग असतात. उदा. नाक, कान, डोळे, त्वचा हे अंग आहेत ज्यांच्यात ऍलर्जी लगेच होते. ऍलर्जी चे अनेक प्रकार आहेत आणि हि अनेक कारणांमुळे आपल्या शरीरात होते. याचा मुख्य कारण प्रदूषित हवा. आपला वातावरण खूप जास्त प्रदूषित झाल आहे. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज, नाक, कान, घश्याचे आजार, अस्थमा इत्यादी खूप वाढले आहेत. ऍलर्जी मुळे चर्म रोग पण होतात. यामुळे त्वचा लाल होते, त्वचेवर पुळ्या होतात. जर आपल्याला देखील श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा सारखी सारखी खाज सुटत असेल, पुळ्या उठत असतील, सारख्या सारख्या शिंका येत असतील तर हि काही ऍलर्जी ची लक्षणे आहेत.

आपल्याला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला हवे ऍलर्जी ची काय करणे आहेत? आणि त्याच्यावर कोणते घरगुती उपचार आहेत? ऍलर्जी शरीरात अनेक प्रकारे होते आणि ऍलर्जी होण्याचे खूप कारण आहेत. हवेमधील प्रदूषण, संक्रमण यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होते. धूळ, माती आपल्या नाकात जाण्याने शिंका येतात हि देखील एक ऍलर्जी आहे. तसेच वातावरणात होणारे परिवर्तन याच्यामुळे देखील ऍलर्जी होते. तर कोणाला मधमाशांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते, काही प्राण्यांना स्पर्श केल्याने देखील ऍलर्जी होते उदा. कुत्रा, मांजर. काही औषधांमुळे देखील ऍलर्जी होते. म्हणून ऍलर्जी वर घरगुती व डॉक्टरी उपचार करणे आवश्यक आहे.

ऍलर्जी ची लक्षणे जाणन्या साठी आपल्याला काही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. ऍलर्जी च्या लक्षणामध्ये नाक सुजणे, सर्दी खोकला कमी न होणे, आपल्या डोळ्यात जळजळ होणे, किंवा डोळ्यातून सारखा सारखा पाणी येणे, डोळे लाल होणे हि देखील ऍलर्जी ची कारणे आहेत. जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, सारखा सारखा खोकला येत असेल तर हे दमा किंवा ऍलर्जी ची लक्षणे आहेत. काही लोकांना गर्मी च्या दिवसात, थंडी व पावसाळ्यात देखील त्वचेची ऍलर्जी होते. पुरळ उठणे, खाज येणे हि काही लक्षणे आहेत, नाक बंद होणे, खूप सर्दी होणे, सारखी सारखी शिंक येणे. हि देखील काही लक्षणे आहेत.

काही लोक एवढे संवेदनशील असतात त्यांना खाण्या पिण्याच्या वस्तूंमुळे देखील ऍलर्जी होते. काहीलहान मुले व वृद्धाना धन्यामुळे देखील ऍलर्जी होते. ज्यामुळे ते गव्हापासून बनवलेली चपाती देखील खावू शकत नाही. काही लोकांना दुध, अंडी, मासे या पासून देखील ऍलर्जी होते. याच्यावर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या. काहीना ऍलर्जी हि औषधांमुळे देखील होते, किड्यांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते तर काहीना ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटीक क्रीम लावण्याने देखील ऍलर्जी होते. ऍलर्जी मुळे आपले स्वास्थ खराब होतो. आणि पोट दुखी, उल्टी, अतिसार, गजकर्ण, खाज, नाक बंद होणे, पुरळ उठणे असे आजार उद्भवतात.

जर आपल्याला ऍलर्जी वर उपचार करायचा असेल तर आपण औषधांचा वापर करू शकता पण यामुळे आपली ऍलर्जी पूर्ण पणे जाणार नाही. ऍलर्जी साठी काही आयुर्वेदिक व घरगुती उपचार देखील आहेत. याच्या उपयोगाने आपण ऍलर्जी पूर्ण पणे घालवू शकतो. जर आपल्याला त्वचेत ऍलर्जी होत असेल तर कापूर आणि नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. याच्यासाठी कापूर थोडा घ्या आणि नारळाच्या तेलात मिळवून पेस्ट बनवा आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज सुटत असेल तिथे लावा, आपल्याला आराम मिळेल.

ऍलर्जी झाल्यावर मिठाच्या पाण्याने गरारा करण्याने आपल्या नाकात आणि तोंडात फसणारी धूळीचे कण आणि बल्गम बाहेर निघून जातो. ज्यामुळे आपल्या नाकाच्या ऍलर्जी ची समस्या दूर होते. याचा उपयोग करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चिमटी सोडा चांगल्या प्रकारे मिसळा आणि या पाण्याचे सेवन करा असे केल्याने आपल्या शरीरातील ऍलर्जी जाईल. आणि नाकात होणारी ऍलर्जी कमी करण्यासाठी आल्याचा वापर करू शकता. कारण आल्यामध्ये एन्टीबायोटीक व एन्टी वायरल तत्व असतात जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होत नाही.

एक कप पाण्यात कापलेला आला, दालचिनीच्या सोबत थोडी लवंग मिळवा व ५ ते १० मिनिटांसाठी उकळवत ठेवा. जेंव्हा हा काढा तयार होईल तेंव्हा याच्यात मध मिळवून चहा सारखा घ्या. असे केल्याने आपली नाकाची ऍलर्जी दूर होईल. असे आपण दिवसातून कमीत कमी तीन वेळा करा आपल्याला आराम मिळेल. तसेच आपल्या घरात असलेले आल, काळी मिरी, तुळशीची पाने, लवंग व खडीसाखर मिळवून चहा बनवा आणि हि चहा पिण्याने आपल्याला ऍलर्जी पासून आराम मिळतो. यामुळे फक्त आपली ऍलर्जी ठीक होत नही तर आपल्याला ऊर्जा देखील मिळते यामुळे आपले इतर आजारांपासून देखील बचाव होतो.

एलोवेरा (कोरफड ) पण आपल्या त्वचा रोगांवर गुणकारी आहे. कारण एलोवेरा मध्ये जीवाणूरोधी व एन्टीब्याकटेरियल तत्व असतात. त्वचेवर होणारी खाज ठीक करण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. एलोवेरा ची काही पाने वाटून घ्या आणि हे त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेवरील ऍलर्जी दूर होईल. याचा वापर आपण कमीत कमी दिवसातून दोन वेळा करा यामुळे आपल्याला फायदा होईल.

कडूलिंबा मध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुण असतात याच्यात जीवनु नष्ट करण्याची शक्ती असते. कडूलिंबाची पाने रात्र भर भिजवून ठेवा आणि हि पाने सकाळी वाटून घ्या आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज होत असेल त्या ठिकाणी लावा असे केल्याने आपली ऍलर्जी दूर होईल. हे काही ऍलर्जी वर घरगुती उपचार आहेत याचा वापर आपण करू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुण- (Uses of Mint and its medicinal uses)

सगळ्यांनाच माहीत आहे कि पुदिन्यापासून चटणी तसेच पुदिन्याच्या वापर जलजीरा बनवण्यासाठी ही केला जातो, पण एवढेच नाही तर पुदिन्या मध्ये औषधी गुण असतात, आणि यामुळे अनेक समस्यांचे निवारण होते. पुदिन्याचा वापर अनेक प्रतिजैविक (Antibiotic) औषधांमध्ये सुद्धा केला जातो.

या लेखामध्ये मी तुम्हाला पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुणांबद्दल सांगणार आहे.

पुदिना हि एक साधारण दिसणारी वनस्पती आहे, पण पुदिन्यामध्ये खूप प्रभावशाली तसेच चमत्कारी गुण असतात. उन्हाळ्यात जेवणासोबत पुदिन्याची चटणी खूप लाभदायक असते. पुदिना औषधी गुणांसोबत आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर चमक आणण्यासाठी खूप लाभदायक आहे.

पुदिन्याचे फायदे

१. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल (चरबी ) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.

२. जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

३. जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.

४. सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.

५. जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.

६. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

७. जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून  घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.

८. जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजा पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

९. जर आपल्या तोंडाला  वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.

१०. पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

११. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:-  कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

१२. कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसा सोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

१३. सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग:- जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल, दोन मोठे चंमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

 जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

पुरुषांसाठी आरोग्य संबंधी टिप्स- (Health tips for men)

आजकाल सगळेच जण आपल्या शारीरिक तंदुरुस्ती साठी संवेदनशील असतात आणि सगळ्यांनाच वाटते आपले शरीर एकदम तंदुरुस्त आणि योग्य शरीररष्टी असावी आणि यासाठी ते खूप प्रयत्न करतात. काहीजण खुप सडपातळ असतात आणि त्यांना आपले वजन वाढवायचे असते तर काहींचे वजन खूप जास्त असते, त्यांना ते वाढलेले वजन कमी करायचे असते. अजून वेगवेगळे प्रकारचे अंतर पुरुषांच्या शरीरामधे असतात उदा. रंग, रूप, कोणी उंच असतो, कोणी मध्यम उंचीचा असतो, तर कोणी बुटका असतो.

अयोग्य शरीराची काही कारणे आहेत. अनुचित खानपान म्हणजेच काहीही खाणे, अनियमित खानपाणामुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम तसेच विविध आजार होतात, यामुळे कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. जसे जंक फूड च्या नियमित सेवनामुळे शुक्राणूंची गुणवत्ते मध्ये कमतरता येते

योग्य आहार

जर आपल्याला स्वतःला तंदुरुस्थ ठेवायचे असेल तर कमीत कमी २-३ केळी दुधा सोबत खात जा, आपल्याला फायदा होईल. असे केल्या मुळे  हृद्य संबंधी आजार कमी होतात. Packing Foods खाल्यामुळे आजार होऊ शकतात कारण यामध्ये अशा Metals चा वापर केला जातो जे आरोग्यासाठी चांगले नसतात. यामुळे अशा पदार्थांचा सेवन करू नका. ताजे पदार्थ खात जा. नेहमी व्यायाम करा, चालण्याचा व्यायाम करा यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल व आपण तंदुरुस्त रहाल.

कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ हे चवदार असतात पण याचे सेवन अधून मधून करा. नेहमी चांगल्या तेलाचा वापर करा. जाडेपणा मुळे पुरुषांच्या लैंगिक सामर्थ्य वर परिणाम होतो. म्हणून जास्त वजन वाढू देऊ नका. त्यासाठी कोल्ड ड्रिंक (शीत पेय), चहा, Coffee, लाल मांस, चिप्स, तेलकट पदार्थ अशा पदार्थांचे सेवन एकदम कमी करा. जर आपल्याला व्यायामशाळेत जायला वेळ मिळत नसेल तर घरी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ऑफीस, शाळा, कॉलेज, बाजारात जाताना चालत जाण्याचा प्रयत्न करा, लिफ्ट चा वापर टाळा, जिन्याचा वापर करा, याचा आपल्याला चांगला फायदा होईल.

आपल्या खाण्यामध्ये ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा. सकाळी नाश्ता जरूर करावा. सलाड आणि अंकुरित कडधान्यांचा जेवणात वापर करावा आणि जेवताना चपाती आणि भात यांचे एकाचवेळी सेवन करू नका थोड्या अंतराने करा म्हणजेच सकाळी चपाती खा व दुपारी भात खा. आपल्या शरीराची मालिश जरूर करा. रात्री लवकर झोपा व सकाळी लवकर उठून व्यायाम करा तसेच चालण्याचा व्यायाम करा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

रागावर नियंत्रण कसे करावे (How To Control Anger)

आजकाल लोकांमध्ये short temper (रागीट) चे प्रमाण वाढले आहे. जर आपण देखील रागीट आहात व जर आपल्याला देखील राग लगेच येतो, तर याच्यावर उपाय करणे जरुरी आहे. हे आपल्या सुखी जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. काही लोकांना एवढा राग येतो की त्यांना स्वतः वर नियंत्रण ठेवता येत नाही. ते रागाच्या भरात काहीही करतात, त्यांना इतर गोष्टींचा भान रहात नाही.

अति रागाचे दुष्परिणाम :

क्रोध एक सामान्य आणि जास्त करून स्वाथ्यप्रद मानवाच्या मनातील भावना आहे. रागावर आपण जर लगेच नियंत्रण केलेत तर ते चांगले आहे, जर आपण रागावर नियंत्रण नाही केलेत तर आपल्या समस्या वाढतात. त्या शारीरिक असो, मानसिक असो व भावनिक किंवा सामजिक अति रागामुळे काहीच समजत नाही आणि रागाच्य भरात आपण काहीही करून बसतो. आणि आपले स्वतःचे जास्त नुकसान होते. अतिरागामुळे आपल्या जीवनातही नाही तर आपल्या आरोग्यावर देखील त्याचे वाईट परिणाम होतात. रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके जोराने वाढतात, रक्तदाब मोठ्या प्रमाणत वाढते, तणाव वाढते हे त्याचे प्रारंभिक परिणाम आहेत. श्वास घेण्याची प्रक्रिया जोराने होते, जेव्हा राग येतो तेंव्हा शरीर व मन विचलित होते, वेळेनुसार Metabolism मध्ये बदल होतो. फक्त आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या इतर गुणवत्ते वर देखील प्रभाव पडतो.

रागामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते, जसे हृदयविकाराचा झटका, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्वचे चे आजार , अनिद्रा, पचना संबंधी च्या समस्या, चिंता वाढणे, डोकेदुखी, उच्चरक्तदाब, नकारात्मक भावना निर्माण होते. राग आपली विचार करण्याची शक्ती कमी करतो अशावेळी स्वतःची चुकी असली तरी माणूस ती मानायला तयार नसतो तो नेहमी दुसऱ्याची चुकी शोधत असतो यामुळे अजून राग येतो. रागाचे दुष्परिणाम सगळ्यांनाच माहीत असतात म्हणून सगळ्यांनाच रागावर नियंत्रण कसा ठेवावा हे त्यांना जाणून घ्यायचे असते. जेंव्हा राग येतो तेंव्हा प्रथम आपल्या मनावर नियंत्रण ठेवा, जर आपले आपल्या मनावर नियंत्रण असेल तर आपल्याला राग येणार नाही, कारण भास्त्रिका व नाडी शोधन प्राणायम मनातील बेचैनी कमी करण्यास मदत करते. जेंव्हा आपले मन शांत व स्थिर असते तेंव्हा आपली क्रोधीत होण्याची संभावना कमी होते.

जेंव्हा पण आपल्याला खूप राग येईल तेंव्हा मोठा श्वास घ्या व सोडा. जर आपण काही वेळासाठी असे केलेत तर आपला राग कमी होईल. अशावेळी आपले डोळे बंद करा मोठा श्वास घ्या आणि आपल्या मनात काय चालेय त्याकडे लक्ष द्या. आपल्यला माहित असेल श्वास तणाव दूर करते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते, जर आपल्याला रात्री नीट झोप लागत नसेल तर हे देखील राग येण्याचे कारण असू शकते, म्हणून दररोज ८ तास झोपणे जरुरी आहे. यामुळे आपले मन व शरीराला आराम भेटेल आणि आपली बैचैंनी कमी होईल, ज्यामुळे राग येणार नाही. झोपल्या मुळे आपल्या रागावर नियंत्रण राहते. तसेच आपण ध्यान (meditation) करा आपल्याला लाभ होईल, प्राणायम चा नियमित अभ्यास करा संतुलित आहार करा, जेंव्हा पण आपल्याला राग येईल तेंव्हा काहीतरी मनात ल्या मनात गुणगुणत जा अस केल्याने आपला राग शांत होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!