धने | Coriander Benefits In Marathi

– मुखशुद्धीसाठी ओले धने सुकवून तयार केलेली धन्याची डाळ वापरतात.

– धने व जिरे समभाग घेऊन कुटून त्याचा मसाला बनवण्यात येतो.

– पित्तप्रकृती असणाऱ्या लोकांनी धन्याजिऱ्याचा जास्तीत जास्त वापर करावा.

– धने, जिरे, मिरे, पुदिना, सैंधव व बेदाणे लिंबाच्या रसात वाटून बनविलेल्या चटणीचा उपयोग भोजनात केल्याने भोजनाची रूची वाढते.

– धने वेलची व मिरे कुटून त्यात खडीसाखर व तूप घेतल्याने अरूची दूर होते.

– धने पाण्यात भिजत ठेवून ते चांगले कुसकरावेत नंतर ते पाणी गाळून त्यात मध व साखर घालून ते पाणी प्यायल्याने तृषा शांत होते.

– धने व बेदाणे यांचे पाणी पित्ताने चढलेल्या तापात फायदेशीर असते.

– धने व बडीशेपचा काढा घेतल्याने शरीरातील दाह, तृषा, मूत्रदाह व बैचेनी दूर होते तसेच घाम येऊन आमजन्य ताप उतरतो.

– धने व खडीसाखर घेतत्याने पोटात होणारा दाह शांत होतो.

– धने रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठून ते पाणी गाळून घ्यावे त्यात एक तोळा खडीसाखर घालून ते पाणी प्यायल्याने पित्तज्वराने होणारा दाह दूर होतो.

– धने व जिरे रात्री भिजत घालून सकाळी ते चांगले कुसकरावेत नंतर ते पाणी गाळून चार पाच दिवस प्यायल्याने देवी येऊन गेल्यानंतर शरीरात साठलेली अतिरीक्त उष्णता बाहेर निघून जाते.

– धने पाण्यात भिजत घालून नंतर ते कुस्करून पाणी गाळून घ्यावे त्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे दुखणे बंद होते.

Leave a Comment