दैनंदिन वेळापत्रक | Daily schedule for healthy living in Marathi

१.सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास ताजे पाणी प्यावे . तसेच दिवसभर भरपूर पाणी प्यावे .

२. सकाळी नियमित किमान एक तास व्यायाम करा .

३. नियमित एक फळ खात जावा .

४. जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात व त्याच वेळेत जेवावे .

५. जेवणात पालेभाज्याचे प्रमाण अधिक ठेवावे .

६. दोन्ही वेळेस संतुलित आहार घ्यावा .

७. एकदाच भरपेट खाण्यापेक्षा काही अंतराने तीन-चार वेळा थोडे थोडे खावा .

८. मनावर तणाव न ठेवता सावकाशपणे अन्न खावे .

९. नियमित भोजनात २-३ चपात्या , १ कटोरी भात , १ वाटी दही ,२ प्लेट कोशिंबीर ,१ ग्लास दूध ,मोसमी फळे आदींचा दररोज समावेश करावा

१०. रोजच्या आहारात तळलेले पदार्थ कमी खावा . जेवणात जास्तीत जास्त कोशिंबीर, हिरव्या भाज्या यांना प्राधान्य द्या .

११. नियमितपणे दीर्घ व खोलवर श्वासोच्छवास घ्या जेणेकरून तुमच्या शरीराला नेहमी जास्त ऑक्सिजनमिळेल .

१२. आहारात साखर व मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवा.

१३. चहा ,कॉफी,धूम्रपान यांचे सेवन टाळावे .

१४. बटाटे, केळी ,चिक्कू ,साखर ,भात याचे सेवन कमी करा .

१५. रात्री झोपण्याआधी कमीत-कमी तीन तास अगोदर जेवण घ्या .

१६. दिवसभर आनंदी राहा . भरपूर हसा , हास्यविनोद करा . तसेच तणावामध्ये देखील खूप हसा आणि रागावर आवर घाला .

१७. दररोज ६-८ तास नियमितपणे झोप घ्यावी .

● ऋतूनुसार संतुलित आहार :-

थंडीतील आरोग्यदायी आहार :-

गूळ पोळी :: थंडीतला सर्वोत्तम पदार्थ

गूळ शरीरात उष्णता निर्माण करून थंडीपासून संरक्षण देतो .

गूळाची पोळी अधिक चांगल्या रीतीने पचण्यासाठी त्या जोडीला साजूक तुपाचाही उपयोग करू शकतो .

गूळ आणि तीळ हे वात व कफ कमी करणारे पदार्थ आहे

१. थंडीत भूक वाढत असल्याने आहार वाढवा . विविध प्रकारच्या सुप्सचा आहारात समावेश करा .

२. मूग , मसूर ,मटकी ,वाटणा ,चवळी आदी कडधान्याचा वापर वाढवावा .

३. दुधाचे पदार्थ , लोणी ,पनीर ,खरवस आदींचा आहारात समावेश वाढवावा .

४. मोसमी फळे खावीत .तसेच या ऋतूत येणारी फळे म्हणचेच बोरे ,आवळे आदींचे सेवन करा .

५. शरीराला उष्णता देणारे पदार्थ म्हणजेच तिळगुळाची पोळी , बाजरीची भाकरी आदींचा वापर आहारात करावा .

६.कोमट पाणी प्यावे . त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते .

उन्हाळ्यातील आहार :-

१. उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा . उन्हाळ्यात पचनास हलका असा आहार घ्यावा .

२. कोकम सरबत ,माठातील थंड पाणी , लिंबू सरबत ,ताक ,शहाळाचे पाणी ,विविध फळांचे रस इ पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे हितकारक असते .

३. उन्हाळ्यात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे .

४. उन्हाळ्यामध्ये तूप,ताक,दही,दुध,लस्सी यांचा वापर आहारात करावा .

५. सामान्याआहारातील भात ,भाकरीचा समावेश अधिक करावा .

६. आहारात विविध पालेभाज्यांचा समावेश अधिक प्रमाणत करावा .तसेच गाजर ,बीट ,काकडी आणि कांद्याचे कोशींबर यांचा आहारत समावेश करावा .

७. उन्हाळ्याच्या दिवसात करवंदे ,द्राक्षे ,टरबूज ,कलिंगड , फणस ,आंबे ,डाळींब यासारखी रसदार फळे जास्त प्रमाणात खावीत .

८. उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थाचे सेवन कमी प्रमाणात करावे .

९. उन्हाळ्यात आईस्क्रीम ,फ्रीज मधील थंड पाणी ,तसेच विविध शीतपिये यांचा ठराविक प्रमाणातच वापर करावा .

Leave a Comment