कुत्रा चावणे | Dog Bite First Aid Treatment In Marathi

कुत्रा चावणे ही एक गंभीर बाब ठरू शकते. कुत्रे जरी रेबिजच्या रोगाने पछाडलेले नसले तरी त्याच्या चाव्यामुळे रक्त दुषित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रथमोपचाराची व वैदयकिय मदतीची आवश्यकता असते. कुत्रा चावल्यावर शक्य झाल्यास त्या कुत्र्यावर 10 दिवस लक्ष ठेवावे. या दरम्यान जर तो कुत्रा स्वस्थ असेल तर चावलेल्या व्यक्तीस रेबिज होण्याची शक्यता कमी असते.

प्रथमोपचार :

– कुत्रा चावलेली जागा लवकरात लवकर भरपूर साबण लावून वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवावी.

– जखम झाली असेल तर ती स्वच्छ कापडाने झाकून ठेवावी जेणेकरून हवेतील जंतुचा संसर्ग होणार नाही.

– डॉक्टरांकडे उपचार घ्यावा.

Leave a Comment