डोळे येणे | Eye Infections in Marathi

– डोळे येणे हा संसर्गजन्य आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु याचा संसर्ग कसा होतो, याबद्दल अनेक गैरसमज आहे.

– डोळे आलेल्या व्यक्तीकडी पाहिल्याने डोळे येतात. हा एक गैरसमज आहे.

– ज्यांचे डोळे आले आहेत त्या रुग्णाच्या डोळ्यातून येणारे पाणी यामध्ये जीवाणू असतात. असा संसर्ग होऊ नये म्हणून पुढील खरबरदारी घ्यावी.

– रुग्णाने सारखा डोळ्यांना हात लावू नये, डोळे चोळू नये, यामुळे कुटुंबातील इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

– रुग्णाचे डोळे स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.

– दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने पुढील प्रमाणे डोळे स्वच्छ करावे. ग्लासभर पानी चांगले उकळुन त्यात थोडे मीठ टाकून त्यात स्वच्छ कापडाचे छोटे छोटे तुकडे टाकावेत. त्यामुळे ते कापडाचे तुकडे निर्जंतुक होतील.

– डोळे आलेल्या व्यक्तीला हस्तांदोलन करू नये. तसेच त्यांच्या अधिक संपर्कात राहू नये.

– डोळे आलेल्या व्यक्तीला एका कुशीवर अशा प्रकारे झोपवायचे की त्याचा निरोगी डोळा खालच्या बाजुस येईल.

– स्वतःचा रुमाल, टॉवेल व अंथरुण नेहमी वेगळे ठेवावे. डोळ्यांना खाज सुटली तरी हाताचा उपयोग न करता स्वच्छ रुमालाने डोळे चोळावेत.

– डोळे आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळून घरीच आराम करावा. तसेच डोळे आलेल्या आलेल्या मुलालासुद्धा शाळेत पाठवू नये. यामुळे डोळे येण्याच्या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते.

Leave a Comment