पाण्यात बुडणे | Drowning treatment first aid in Marathi

पाण्यात बुडल्यावर प्रथम नाकातोंडात पाणी जाऊन फुप्फुसे व जठर यात पाणी शिरते. श्वासनलिकेत पाणी शिरल्यानंतर फुप्फुसांचे श्वसनाचे काम बंद पडते. श्वसन बंद पडल्यानंतर तीन मिनिटांत श्वसन परत चालू करणे शक्य झाले नाही तर मृत्यू ओढवतो.

प्रथमोपचार :

– जर एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असेल तर त्वरीत त्या व्यक्तीला पाण्याबाहेर काढावे. पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर प्रथम त्याला कृत्रीम श्वासोच्छवास दयावा. दुसऱ्या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे हवा भरणे हा सर्वमान्य प्रकार आहे.

– बुडलेल्या व्यक्तीची श्वासनलीका मोकळी करा आणि हृदय तसेच श्वास चालू असल्याची खात्री करावी.

– श्वास थांबला असेल तर छाती चोळावी व कृत्रीम श्वास दयावा. ती व्यक्ती बेशुध्द असेल तर तिला खाली झोपवा व त्याचे पोट दाबा.

– त्यानंतर त्या व्यक्तीला उलटे करून पोटाच्या मागच्या भागावर दाब दयावा जेणे करून त्या व्यक्तीच्या शरीरातील पाणी शरीराबाहेर फेकले जाईल.

– लवकरात लवकर रूग्णाला डॉक्टरांकडे न्यावे.

Leave a Comment