दुर्वा | Durva Benefits In Marathi

1) हरळी, दूबा, हरियाला, ग्रंथीचे गवत, शुक्राची श्वेत, भार्गवी, दुरर्मरा, मंगला, धोबाघास, बहुविरा, शतमूला, शठग्रंथी, डॉग्ज टीथग्रास, गारिकेहालू, सायनोडॉन डॅक्टीलॉन अशी अनेक नावे दुर्वांना आहेत.

2) माणसाच्या शरीरातील जादा कडकीमुळे त्याला अनेक रोग होतात. पण कडकी कमी करण्याचा मुख्य गुणधर्म दुर्वांमध्ये आहे.
3) दुर्वा रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक आहेत.

4) पोटाच्या सर्वच विकारांवर दुर्वा अत्यंत उपयोगी आहेत.
5) तांब्याच्या तांब्यात/ भांड्यात पाणी घेऊन त्यात 21 दुर्वांची जुडी सुमारे 4 तास भिजत ठेवून नंतर ते पाणी प्यायल्यास अंगातली कडकी कमी होते.

6) घशाला सतत कोरड पडत असेल तर हे पाणी प्यावे.
7) कामात ताण, आव, त्वचेचे विकार, बारीक ताप, पोटदुखी यांसारख्या विकारांवर दुर्वांचं पाणी अत्यंत उपयोगी आहे.

8) गरोदरपणात ओकाऱ्या, चक्कर येणं, अस्वस्थपणा येणं अशा विकारातही दुर्वा जल वापरतात.
9) दुर्वा शरीराच्या गर्मीवर आणि मूत्ररोगांवर उपयोगी आहेत.

10) दुर्वांचे मूळ वाटून ते दह्यातून दिल्यास गढूळ लघवी स्वच्छ होते.
11) फेफरे, फिट्स आल्या तर दुर्वांचा रस नाकात पिळतात.

12) बद्धकोष्ठ आणि जुलाब या दोन्ही विकारांवर दुर्वांचा रस घेतात.
13)_ दुर्वांमुळे रक्तपित्त, पित्त, रक्तदोष, खोकला यांचा नाश होतो.

14) दुर्वांचा अर्क मुळव्याधीत होणारा रक्तस्राव थांबवतो.
15) लहान मुलांना जंत झाले असतील, त्यांना ओकाऱ्या होत असतील तेव्हा दुर्वाजल प्यायला दिल्यास तो आजार कमी होतो.

16) उष्णतेमुळे नाकातून रक्तस्राव होत असल्यास नाकात दुर्वारस पिळतात. त्यामुळे रक्तस्राव थांबतो.
17) दुर्वांचा सतत स्पर्श बोटांना झाला तरी शरीरातली कडकी बोटांच्या अग्रावाटे शोषून घेतली जाते.

18) पावसाळ्याच्या दिवसात पायाच्या बोटांना भेगा, कात्रे पडतात, त्यावर दुर्वा वाटून त्याचा लेप लावतात.
19) शरीराचा दाह शमविण्याची शक्ती दुर्वांमध्ये आहे.

Leave a Comment