कानाचा आजार : सेरूमेन

१. सेरूमेन हा कानातील मेणासारखा मळ असून सेरूमिनस आणि फिलोसेबॅसिसय ग्रंथीच्या स्त्रावामुळे, तसेच अस्तरधातुंच्या पेशी, धूळ आणि इतर कचरा यामुळे निर्माण होतो. रूग्ण कानात मळ असणे हे अतिशय महत्वाचे समजतात.

२. लक्षणे : रूग्ण ऐकू कमी येते अशी तक्रार करतात, टिनीटस (कानामध्ये आवाज येणे), चक्कर येणे, ओटाल्जिया अर्थात कान दुखणे, खोकला (कानातील एका मज्जातंतूच्या उत्तेजनामुळे निर्माण होणारी प्रतिक्षिप्त क्रिया) अशी लक्षणे दिसतात.

३. व्यवस्थापन : अशी स्थिती निर्माण होऊ न देणे. कान स्वच्छ करण्यासाठी कापसाचा बोळा वापरल्यास असा मळ साठणे वाढते अथवा कसे हे अजून निश्‍चित झालेले नाही. रोग निर्माण करणार्‍या प्रवृत्ती – कानाच्या आतील भागावर जास्त केस असणे, कानाचा आतील भाग बारीक असणे, श्रवणशक्ती वाढविणारी यंत्रे कानामध्ये बसविणे

४. उपचार : सेरूमिनो लायटिक्स अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात. बायकार्बोनेटचे द्रावण – बायकार्बोनेटचे १०% पाण्यातील द्रावण कानातील मळ विरघळविण्याची क्रिया उत्तम प्रकारे करते असे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.

५. कार्यपध्दती :

– जर मळ अत्यंत घट्‌ट असेल तर पिचकारी वापरण्याआधी सेरूमिनोलायटिक काही दिवस वापरावे.

– कानात पिचकारी मारण्यासाठी कोमट पाणी वापरावे. त्या पिचकारीचा रोख कानाच्या बोगद्याच्या तळाच्या बाजूकडे असावा.

६. कानात पिचकारी मारल्यामुळे निर्माण होणार्‍या अडचणी :

– सेरूमेन निघण्यात अडथळा होणे.

– कानाचा बाह्यभाग आणि मधील भाग यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणे.

– कानाच्या पडद्याला भोक पडणे

– कानाच्या बाहेरील पाळीला इजा होणे.

– कान दुखणे.

– चक्कर येणे.

– कानामध्ये आवाज येणे.

७. मळ काढण्याची शास्त्रोक्त क्रिया :

– शोषून घेण्याची क्रिया, आणि खरवडण्याची क्रिया या दोहोंच्या योग्य साधने वापरून आणि सूक्ष्मदर्शक यंत्र आणि कानाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी दुर्बीण यांचा वापर करून मळ काढता येतो.

Leave a Comment