भाजणे | First Aid For Burn In Marathi

आगीच्या संपर्काने तसेच काही संहत रसायनांमुळे कातडी जळते आणि भाजते. भाजण्यामुळे कातडी खराब होते, हात पाय वेडे वाकडे होतात व मुख्य म्हणजे मानसिक धक्का बसतो. सर्वप्रथम जखमा किती मोठया व गंभीर आहेत याचा अंदाज घ्यावा. कातडी व पेशी जळाल्यावर शरीरातील द्रव पदार्थ कमी होतो व उष्णता साठून राहते त्यामुळे पहिल्यांदा हि उष्णता कमी करून शरीर थंड करून शरीराचे तापमान कमी करणे आवश्यक असते.

प्रथमोपचार :

– भाजलेल्या जागेवर कमीत कमी दहा ते पंधरा मिनीटे किंवा वेदना कमी होईपर्यंत थंड पाणी टाकावे.

– अवयव पाण्यात बुडविणे शक्य नसेल तर स्वच्छ कपडा पाण्यात भिजवून त्याच्या पट्टया ठेवाव्यात.

– शरीरावर घट्ट बसणाऱ्या वस्तु शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्या.

– भाजलेल्या जखमा हलक्या हाताने सुत न निघणाऱ्या कपडयाने पुसाव्या व त्यावर बॅंडेज बांधावे.

– डॉक्टरांना किंवा रूग्णवाहिकेला त्वरीत बोलवावे कारण दोन ते अडीच सेंटिमीटर पेक्षा मोठी जखम डॉक्टरांनी पहाणे आवश्यक आहे.

– गंभीर भाजण्याच्या प्रकारात रूग्णाला दवाखान्यात नेईपर्यंत जखमेवर बर्फाचा चुरा कपडयात घेऊन बांधावा.

– भाजलेल्या जागेवर लोणी, पिठ किंवा खाण्याचा सोडा यांसारख्या गोष्टी कधीही लावू नये. जखमेवर तेल,मलम लावू नये व जखमेला गरजेपेक्षा जास्त हात लावू नये.

– भाजलेल्या जागेवर कपडे चिकटले असल्यास ते ओढून काढू नये.

Leave a Comment