ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुमुळे तयार होणाऱ्या काही रासायनिक पदार्थांची मेंदुतील तापमान नियंत्रण केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. ताप खूप जास्त असेल तर त्याच्या मेंदुवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर तापाचे रोगनिदान करावे.
प्रथमोपचार :
– साधारण किंवा मध्यम ताप असेल तर कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो.
– ताप कमी न झाल्यास गार पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात व काही वेळाने बदलत रहाव्या.
– पॅरासिटामोल सारखी औषधे तापावर गुणकारी आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
– कोणत्याही आजाराचे ताप हे लक्षण आहे त्यामुळे मुळ आजारावर उपचार करणे आवश्यक आहे.