पहिल्या तीन महिन्यात काय टाळावे

१) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणे टाळा. औषधांच्या अतिसेवनाने गर्भावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

२) खाणं काबूत ठेवा. नवनवीन अन्नपदार्थ आजमावून पाहणे टाळा. अर्ध कच्च राहिलेले मांसाहारी पदार्थ, चीज, समुद्रातील मासे अशा पदार्थातून हानिकारक जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

३) धुम्रपान, मद्यपान व अल्कोहलचे सेवन टाळा.

४) अति त्राण व निराशा टाळा कारण गरोदर स्त्रीच्या अतिरिक्त मानसिक तणावामुळे गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.

५) गर्भारपणात डाएट करू नये, यामुळे तुम्हाला व बाळाला व्हिटामिन, आयन (लोह) व फॉलीक ऍसिड, खनिजे यांसारखी अत्यावश्यक पोषकद्रव्ये मिळणार नाही.

६) अतिशय गरम पाण्याने स्नान करणे टाळा. यामुळे डी हायडरेशनचा त्रास जाणवू शकतो परिणामी बाळाला त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Leave a Comment