फिट/आकडी

एखाद्या व्यक्तीला फीट/आकडी आली असता इतरांनी काय करावे…-

1) गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या
2) पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि त्याला कुशीवर वळवा.
3) त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा.
4) दारं-खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.
5) पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.

काय करू नये…

1) पेशंटच्या अवतीभवती गर्दी करू नका.
2) पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरू शकतो.
3) कांदा चप्पल नाकाला लावू नये. तो पूर्णपणे गैर्समज आहे.
4) फीटमुळे होणारी त्याच्या हाता पायाची थरथर जबरदश्तीने थांबवू नका.

थोड्या वेळाने फीट थांबेल. एपिलेप्सी ही व्याधी असलेल्या व्यक्तीला फीट आल्यावर दर वेळी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज नसते. परंतु पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Leave a Comment