अद्रक | Ginger Benefits In Marathi

1) खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते.

2) तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते.
3) अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही.

4) जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते.
5) सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.

6) आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.
7) ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.

8) आल्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात.
9) डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.

Leave a Comment