सौंदर्य वाढवा आता ग्लिसरीनने

1) ग्लिसरीन हे एक शुद्ध आणि पारंपरिक सौंदर्य प्रसाधन आहे. त्याचा वापर केल्याने सौंदर्यात नक्कीच वाढ होईल.

2) 2-3 थेंब ग्लिसरीन व लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी राहतात.

3) हायड्रोजन पेरॉक्साइड एक चमचा घेऊन त्यात काही थेंब ग्लिसरीन टाकून फाटलेल्या भेगांना लावून ठेवावे. काही वेळा नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे, त्याने पायांचा भेगा कमी होऊन पाय नरम होतील.

4) मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी एक चमचा बेसन, एक चमचा काकडीचा रस, थोडीशी हळद व ग्लिसरीनचे 3-4 थेंब मिसळून मानेवर लावावे. नियमितपणे जर याचा प्रयोग केला तर काळेपणा दूर होतो.

5) नख कडक झाली असतील तर कोमट पाण्यात 3-4 थेंब ग्लिसरीन टाकून काही वेळ नखांना त्यात बुडवून ठेवावे. त्याने नख नरम पडून लगेच कापता येतील.

6) एक चमचा मध आणि एक चमचा ग्लिसरीन पूर्ण चेहऱ्यावर लावून 20 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे नियमित केल्यास चेहर्यावर तेज येईल.

7) हाताच्या कोपर्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लिसरीन लावावे. त्यानंतर कोमट पाण्यात एक जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. असे केल्याने काळेपणा दूर होतो.

8) 2 चमचा ग्लिसरीन, दोन चमचा सिरका मिसळून केसांना लावा. 15-20 मिनिटानंतर केस चांगले धुऊन टाकावे. याने केसातील कोंडा दूर होतो आणि केस नरम व चमकदार राहतात.

9) चार चमचे लिंबाचा रस, चार चमचे ग्लिसरीन, चार चमचे गुलाब जल मिसळून त्याला चांगले फेटून घ्यावे व एका बाटलीत भरून ठेवावे. हे एक चांगले हँड लोशन आहे. याचा उपयोग तुम्ही केव्हाही करू शकता.

10) पपईच्या सालांना उन्हात वाळून त्याचे पावडर तयार करावी. त्यात ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो.

11) एक किलो साखरेत 100 ग्रॅम लिंबाचा रस टाकून त्याला शिजवावे. खाली उतरवल्यानंतर त्यात 1 चमचा ग्लिसरीन, एक चमचा मध टाकावे. हे घरच्याघरी तयार झालेले वॅक्स आहे.

Leave a Comment