द्राक्षे | Grapes Eating Benefits In Marathi

– द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे.

– तसेच द्राक्षांपासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे.

– पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत.

– घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी.

– मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात.

– मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका उपयुक्त आहेत.

– रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते.

– घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो.

– मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते.

– मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो.

– क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा.

– क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

Leave a Comment