ज्ञानमुद्रा

1) अष्टावक्राच्या जनकाने ज्ञानाची व्याख्या अगदी सोपी केली आहे. त्याने म्हटले आहे की, अज्ञात असलेले माहित करून घेणे याला ज्ञान म्हटले जाते. बहुतेकांना माहीत नसते की आपली दिनचर्या किती अज्ञाताने भरलेली आहे.

2) योगात ज्ञानमुद्रेचे महत्व मोठे आहे. त्यात ज्ञानमुद्रा आपल्या तंद्रीला तोडत असल्याने ती श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हातातील नसाचा संबंध सरळ मेंदूशी असतो.

3) डाव्या हाताचा संबंध उजव्या मेंदूशी तर उजव्या हाताचा संबंध डाव्या मेंदूशी आहे. ज्ञानमुद्रा मानवाच्या झोपलेल्या शक्तींना जागृत करण्याचे काम करते. ज्ञानाचा अर्थ खूप माहिती किंवा वैचारिकता नाही.

4) अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोट एकमेकांना स्पर्श करेल, अशा अवस्थेत ठेवून इतर तीन बोटांना सरळ ठेवा. सिध्दासन, उभे राहून किंवा झोपेतही जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे या मुद्राचे प्रयोग करावा.

5) ज्ञानमुद्रेमुळे ज्ञान वाढते. अंगठ्याच्या दोन्ही बाजूंच्या ग्रंथी सक्रीय राहतात. यामुळे मेंदुची स्मृती वाढते. ही मुद्रा एकाग्रता वाढविते. निद्रानाश, हिस्टेरिया, राग आणि निराशेला ही मुद्रा दूर करते. त्याच्या नियमित अभ्यासाने मानसिक आजारांपासूनही मुक्ती मिळते. तसेच व्यसनांपासूनही लांब राहता येते. मन प्रसन्न राहते.

Leave a Comment