केसांचे सौंदर्य | Beautiful Hairs Tips In Marathi

१. सध्याच्या धावत्या जीवनशैलीमुळे अशा कितीतरी महिला आहेत, ज्यांना आपल्या केसांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे कितीही सुंदर केस असले तरी त्याची काळजी न घेतल्याने त्यांच्या केसांचे सौंदर्य टिकून राहत नाही. घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

– जर आपण काही उपाय नियमित केले तर तुमच्या केसांचे गेलेले सौंदर्य तुम्हाला पुन्हा मिळेल.

२. तेल लावणे – केसांमध्ये जवळपास 1 तास तेल मुरले पाहिजे, त्यामुळे केसांच्या मूळापर्यंत तेल जाते. डोक्‍यावर कोमट तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलने डोके झाकून घ्यावे. त्यामुळे केसांना वाफ मिळते. कोणत्याही तेलाने केस वाढतात असे नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असते.

३. केसांची स्वच्छता – ज्याप्रकारे केसांना तेल लावणे गरजेचे आहे तसेच केसांची स्वच्छता राखणेही आवश्‍यक आहे. जर आपले केस लांब आहेत तर ते आठवड्यातून दोन वेळा धुवावेत. आपल्या केसांची स्वच्छता खूप गरजेची आहे, त्यामुळे केसांच्या मूळांना श्वास घेण्यास जागा मिळते.

४. संतुलित आहार – चांगल्या केसांसाठी योग्य आणि संतुलित आहार आवश्‍यक आहे. पालेभाज्या, बदाम, मासे, नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील.

५. केस बांधून ठेवावेत – प्रदूषण, धूळ, माती आणि हवेपासून केसांना वाचविण्यासाठी ते बांधून ठेवावेत. जर आपण प्रवास करत असाल तर आपण केस बांधणे जास्त गरजेचे असेल.

६. केसांना ट्रिम करावे – केसांना तीन महिन्यातून एकदा ट्रिम करावे. त्यामुळे दोन फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका होईल. केस ट्रिम केल्याने ते चांगले वाढतात.

७. ड्रायर आणि इतर मशीनचा वापर करू नये – हॉट आयरन, ब्लो ड्रायर किंवा केसांना कुरळे करणारे मशीन वारंवार वापरू नये. त्यामुळे केस खराब होतात. जर आपले केस लांब आहेत तर ते वाळविण्यासाठी ड्रायरचा वापर करणे नुकसान करू शकतात, कारण त्याने केस खराब होतात. केस वाळविण्यासाठी उन्हात पाच मिनिटे उभं राहावे पण ड्रायरचा वापर करू नये.

८. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना व टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होते. केस गळण्याचे प्रमाण कमी होते व केसाची वाढ व्हायला लागते.

९. केसांसाठी नारळाचे दूध अतिशय पोषक व गुणकारी. टाळूची त्वचा व केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपायकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई ची गोळी कुटून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. असे आठवडयातून किमान दोनदा करावे. या उपायाने निश्चितच केसांचे व टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारते.

१०. केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, लिंबू, नागरमोथा यांसारख्या नैसर्गिक गोष्टीचा वापर करा. आवळा, मेथी पावडरच्या वापराने केस चमकदार होतात.

११. मेहंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करुन केसांना लावा. त्यामुळे केसाची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो.

१२. जास्वंदीची फुले ही केसवाढीसाठी आणि केसांचा रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. जास्वंदीची फुले गुणाने थंड असल्याने त्यापासून बनणाऱ्या तेलाचा उपयोग शांत झोपेकरिता होतो.

१३. केसांच्या वाढीस कोरफड उपयुक्त. तिच्या नियमित वापराने केसांतील कोंडा डोक्यातील खाज कमी होते. केस छान, सुटे, मोकळे, चमकदार होतात.

१४. दोन अंडी, १ लिंबू, आवळा पावडर यांचे मिश्रण केसांचा मऊपणा वाढविते, कोंडा काढण्यास मदत मिळते.

१५. आंबट दही केसांच्या मुळापासून लावणे, केसांचा तेलकटपणा कमी होतो.

१६. केस सुंदर काळेभोर होण्यासाठी डोक्याला तिळाचे तेल लावावे. कानात एक-एक थेंब तिळाचे तेल टाकावे. तळपायांना रात्री झोपताना तीन वेळा तिळाचे तेल चोळावे.

१७. लिंबाची पाने रात्री पाण्यात भिजत ठेवावीत. सकाळी हे पाणी उकळून त्याने स्नान करावे. केसातील कोंडा दूर होतो.

१८. आयुर्वेदानुसार खोबरेल तेल बनविण्याचा विधी – प्रथम ओले खोबरे बारीक वाटून घ्या. त्यातून खोबऱ्याचे दूध काढून घ्यावे. नंतर हे दूध कमी उष्णतेवर गॅसवर ठेवावे. यामुळे यातील पाण्याचा अंश उडून गेल्यावर निव्वळ तेल शिल्लक राहील. हे तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे व नियमितपणे याचा वापर करावा. यामुळे केसांची भरपूर वाढ होते. केसांचे पोषण होते.

Leave a Comment