केसांच्या पोताप्रमाणे तेल कसे निवडाल

१. सामान्य केस : सामान्य पोताचे केस हे अति तेलकटही नसतात व रूक्षही नसतात. अशा सामान्य केसांसाठी बदामाचे किंवा आवळ्याचे तेल लावणे उपयुक्त आहे.

२. तेलकट केस : डोक्‍याच्या त्वचेमधून “सीबम‘नामक तेलकट स्त्राव वाहत असतो. ‘सीबम’चे प्रमाण वाढल्यास केस तेलकट होतात. त्यामुळे अशा प्रकारचे केस असणार्‍यांमध्ये ‘सीबम’चे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे आहे.

– म्हणूनच तेलकट केस असणार्‍यांनी ऑलिव्ह किंवा तीळाचे तेल लावणे हितकारी आहे.

३. रूक्ष केस : रूक्ष केस हे कमकुवत, निस्तेज असल्याने त्याला फाटे फुटण्याची शक्यता अधिक असते. रुक्ष केसांमध्ये स्निग्धता वाढवण्याची गरज असते.

– बदाम, नारळ, तीळ, मोहरीच्या तेलाने मसाज करावा.

४. केसात कोंडा अ‍सणे :

– केसात कोंडा असलेल्यांनी तेल लावणे गरजेचे आहे. केसात कोंडा असल्यास टी ट्री ऑईल किंवा भृंगराज तेल वापरावे.

– दमट वातावरण असल्यास केसांना तेल लावणे टाळा. तसेच तुमची त्वचा ऑईली असल्यास तेल लावताना विशेष काळजी घ्या. फिरतीची कामे करणार्‍यांनी केस मोकळे ठेवणे टाळा. यामुळे केसात धुर, धुळ किंवा प्रदुषणामुळे केसांचे नुकसान होते. केसांना तेल लावणे केवळ वाढीसाठी उपयुक्त नसून यामुळे रक्तप्रवाह सुधारतो , ताण तणाव कमी झाल्याने शरीर व मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

Leave a Comment