घरीच करा हातापायांची मसाज | Hand and foot massage at home in Marathi

१. आपला चेहरा नितळ दिसावा यासाठी आपण नेहमी आग्रही असतो. मात्र, आपण हाता-पायांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गोरा चेहरा आणि कालवंडलेले हातपाय, अशी विसंगती दिसते. परंतु काही काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी हाता-पायांची काळजी घेऊ शकतात.

२. योग्य सेवा मिळावी म्हणून बहुतेक महिला पार्लरमध्ये जातात. परंतु घरी देखील आपण मॅनिक्युअरच्या साहाय्याने हातापायाची काळजी घेऊ शकतो.

३. बर्‍याचदा आपल्या चेहर्‍याची त्वचा आणि हाताची त्वचा मॅच होत नाही. अशावेळी आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी बाहेर जातांना सनकोट किंवा सनस्क्रिन लोशन वापरावे. तसेच महिन्यातून किमान एकदा तरी मॅनिक्युअर करावे. त्यामुळे आपली हाताची त्वचा सुदंर आणि मुलायम दिसते.

४. हातांचा मसाज कसा करावा :

1) मसाज खालून वरच्याच्या दिशेने करावा.

2) बोटापासून वरच्या बाजूला एका मागे एक हात गोलाकार फिरवावा.

3) अंगठ्याला गोलाकार मसाज करावा.

4) बोटांचा चांगल्याप्रकारे मसाज झाल्यावर हात मागच्या दिशेने घेऊन मसाज करावा.

5) मनगटला गोलाकार मसाज करावा. म्हणजे बॅंगल स्टेप करावी. नतंर हातांना झटका देऊन हात मोकळे करावे. अशाप्रकारे मॅनिक्युअरची प्रक्रिया पूर्ण होते.

५. मॅनिक्युअर म्हणजे तरी काय?

– मॅनुक्युअर म्हणजे हातांची स्वच्छता करणे होय. हातांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात, तळ हाताला चिरा पडणे, त्वचा खरखरीत होणे. तसेच हातावर काळे डाग पडणे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरीता मॅनिक्युअर करणे गरजेचे असते.

– मॅनिक्युअर मधील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे नखांचे सौँदर्य वाढवणे, जसे नखांची स्वच्छता करणे करणे व नखांना आकार देणे. मॅनिक्युअरसाठी लागणारी साहित्य बाजारात सहज उपलब्ध होतात.

६. मॅनिक्युअर करण्याची पद्धत व त्यासाठी लागणारे साहित्य :

– टॉवेल, नेल रिम्युअर, साबण, ब्रश, नेल-पॉलिश, शॅम्पू, गरम पाणी, क्युटिकल रिम्युअर, कापूस, हँडक्रीम आदी.

७. पद्धत :

– प्रथम कापूस व नेल रिम्युअरच्या साहाय्याने आधीची नेल-पॉलिश काढून टाकावी. काडीने किंवा स्ट्रिकने नखांच्या कोपर्‍यातील कलर नीट काढून नखांना आकार द्यावा.

– मग काडीला कापसाचे आवरण करुन नखाच्या आवतीभोवती असलेली जाड स्किनला लावावे, की ज्यामुळे ती जाड स्किन मुलायम होते. स्किन काढून टाकावे, ज्यामुळे नखांची वाढ चागंल्याप्रकारे होते.

– आता गरम पाण्यात शॅम्पू व हायड्रोजन पॅरॉक्साईड टाकून थोडा वेळ म्हणजे 2-3 मिनिट हात पाण्यात बुडवून ठेवावेत. नंतर ते ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करावे.

– एक- एक करुन दोन्ही हात स्वच्छ करावे. हँडक्रीमने मसाज करावा. क्युटिकलच्या नखांना लावून क्युटिकल कटरच्या साहाय्याने स्वच्छ करावे.

Leave a Comment