हाता-पायांची काळजी | Hand-foot care tips in Marathi

१. चेह-यापेक्षाही हातापायाचे हाल थंडीत फारच होतात. टाचा, गुडघे, कोपरे, घोटे हे इतर वेळी कोरडे असणारे शरीराचे भाग शरीरातील पाण्याच्या अभावाने अधिकच काळे पडतात. त्यांना भेगा पडतात.

२. आपण त्याला क्रीम व तेल लावून मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण त्यापेक्षाही शरीरातील पाणी टिकवून ठेवणा-या क्षाराचा विचार या ऋतूमध्ये होणे आवश्यक आहे.

३. हे काळे पडलेले अवयव मळले आहेत म्हणून परत परत साबणाने धुण्याचा वेडेपणा ब-याच जणी करतात; पण त्यामुळे उलट त्वचा अधिकच कोरडी पडून शुष्क होते. अशा वेळी जर दुपारी उन्हात जाण्याची वेळ येत असेल तर हाताच्या बाहेरच्या बाजूला पिग्मेंटेशन होऊन हाताचा बाहेरचा भागही काळा पडतो व तो जवळजवळ कायमचा राहतो.

४. त्यामुळे थंडीचा ऋतू हा त्वचेची, शरीराची उत्तम काळजी घेण्यामध्ये घालवावा. चेह-यासाठी क्लिन्सिंग – स्वच्छता, टोनिंग-संरक्षण व नरिशिंग – संवर्धन हा सौदर्याचा गुरुमंत्र कायमचा लक्षात ठेवा.

५. चेहरा, हात, पाय, शरीर या प्रत्येकाच्या सौंदर्यासाठी हाच गुरुमंत्र आहे.

– त्यावर उपाय :

१. थंडीसाठी कशाचा वापर करून आपण थंडीचा सामना करायचा. स्वच्छता – तीव्र, सोडा असलेल्या, अल्कली पदार्थांचा वापर शक्यतो थंडीमध्ये टाळावा. कारण त्वचेवरचे तेल व पाणी (मॉइश्चर) या पदार्थाने काढून टाकले जाते व त्याची त्वचेला थंडीत अत्यंत आवश्यकता असते.

२. तेव्हा शरीराला बेबी सोप किंवा अ‍ॅसिडिक फेसवॉश याचा वापर करणे योग्य. आपणही खडेमिठाचा शरीरासाठी क्लिन्सर बनवू शकता.

३. चणा, उडीद, मसूर याच्या डाळीचा जाडसर रवा काढून त्यात खडेमीठ मिक्सरवरून हलके फिरवून मिसळावे. आयत्या वेळी चमचाभर मीठ वरील डाळीच्या रव्यात घालून 5/10 मिनिटे भिजवून संपूर्ण शरीराला घासून धुण्यासाठी वापरावे.

४. तसेच वेळ असेल तर या मिश्रणाचा पॅक करून तळपाय, पाय, हात यांना पाच मिनिटे लावून ठेवा. नंतर अंघोळीच्या वेळी किंवा इतर वेळी गरम पाण्याने घासून धुवावे. फक्त मीठ हे आयत्या वेळी घाला, आधीपासून डाळीच्या रव्यात घालून ठेवू नका.

५. कांतिमान व नितळ त्वचेचे सौम्य स्वच्छता हे गुपित आहे. हळद, चंदन, चणा वा कोणत्याही डाळीचे पीठ एक भाग व केमिस्टकडे मिळणारी फुलर्स अर्थ दोन भाग असे मिश्रण एकत्र करून बाटली भरून ठेवा.

६. आपल्या हवे तेवढे मिश्रण अंघोळीपूर्वी काढून त्यात पाणी किंवा दह्यावरचे पाणी यातील काहीही घालून ठेवा.

७. संपूर्ण कुटुंबासाठी बाथरूममध्ये रोज असे मिश्रण नवे भिजवून ठेवाल तर हिवाळ्यातील सौंदर्यपूर्ण स्वच्छता होईल.

८. जमले तर 5/10 मिनिटे लेपासारखे हे मिश्रण लावून ठेवावे, मग घासून धुवावे. मिश्रण पातळ भिजवून ठेवणे आवश्यक. त्वचेवरील कोरडे त्वचाथर काढून टाकणे हे स्वच्छतेचे महत्त्व आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबर नव्या त्वचाथरांना निर्माण होण्यास उपयुक्त अशी ही प्रक्रिया होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *