उष्माघात | Heat stroke treatment in Marathi

शरीरातील उष्णता वाढल्यास किंवा उच्च तापमानाच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यास शरीरात खूप उष्णता निर्माण होईल व उष्माघाताची स्थिती निर्माण होते.

– उष्माघात झालेल्या व्यक्तीला त्वरीत थंड केले पाहिजे.
– त्याला थंड पाण्याच्या ओल्या कपडयात गुंडाळावे किंवा त्याच्या त्वचेवर थंड पाणी शिंपडावे व थंड पाण्याच्या घडया ठेवाव्यात.
– जर पाणी पिणे शक्य असेल तर त्या व्यक्तीला थोडे पाणी पाजावे. थंड खोलीत झोपवावे.
– जर तापमान कमी झाले नाही तर डॉक्टरांकडे घेऊन जावे.

उष्माघाताची लक्षणे :
– जीव घाबरणे
– उलटी होणे
– अशक्तपणा
– चक्कर येणे
– डोकेदुखी
– हात पाय दुखणे व जड पडणे
– शरीराचे तापमान वाढणे
– त्वचा लाल होणे

Leave a Comment