सांधेदुखी

1) थंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

2) सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत.

3) थंड पाण्यात काम करणं टाळावं.

4) शिळं आणि थंड अन्न घेऊ नये.

5) बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत.

6) मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा.

7) गरम, ताजे अन्न घ्यावे.

8) थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं.

9) सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं.

10) रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं.

11) विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो.

Leave a Comment