दमा | Home Remedies For Asthma In Marathi

1) १/४ कप कांद्याचा रस, १ मोठा चमचा (टेबलस्पून) मध आणि १/८ काळी मिरी यांचे मिश्रण द्यावे.

2) आले आणि यांचा काढा तयार करुन तो १/२ मोठा चमचा घेऊन एक कप पाण्यात लसणाचा रस काढावा. कोमट पाण्याचे १०-१५ थेंब त्यात घालून द्यावे.

3) ‘इनहेलर’चा दिवसभरात एकदा वापर तसेच औषधसेवनाचा कंटाळा न करणे.

4) दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

5) दम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत.

6) दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं.

7) दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं.

8) सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं.

9) रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते.

10) आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो.

11) दम्याचा त्रास असणाऱ्यांनी 2 ते 3 कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमठ काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा.

12) कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी.

13) दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत.

14) च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *