तोंडाची दुर्गंध

1) पिंपळी,जिरे, कुष्ठ, इंद्रयव ही चार द्रव्ये एकत्र करुन चावण्याने मुखदुर्गंधी बरी होते.

2) नागरमोथा, कुष्ठ, वेलची, धणे, ज्येष्ठमध यांचा काढा करुन त्याने गुळण्या करणे. तसेच हे चुर्ण करुन चघळल्याने मुखदुर्गंधी नष्ट होते.

3) तीळ, पिंपळी,जाईची पाने,सहचराची पाने, वेखंड, सुंठ, ओवा, हिरडा यांचे चुर्ण करुन ते रोज साजुक तुपातून घेतल्यास मुखदुर्गंधी नष्ट होते.

4) कोमट पाणी व मध किंवा हळद व मीठ यांच्या गुळण्या केल्याने मुखदुर्गंधी नाहिशी होते.

5) तोंडात नेहमी फ्रेश हर्ब चघळा. यामुळे तुमच्या श्वा साला दुर्गंधी येणार नाही.

6) तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी ग्रीन टी अथवा ब्लॅक टी घ्या. यात तोंडाच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांना मारणारे पॉलीफेनॉल असतात.

7) झिंक असलेल्या माऊथवॉशचा वापर करा.

8) नेहमी दात घासताना जीभ स्वच्छ करा.

9) भरपूर पाणी प्या. द्रवयुक्त पदार्थ घ्या.

10) पोटाची उष्णता वाढविणारे पदार्थ कमी खा.

11) स्नॅक म्हणून इतर काही खाण्यापेक्षा सफरचंद, गाजर, जिकामा खा.

12) तोंडाचे आरोग्य चांगले राहील यास अधिक प्राधान्य द्या. नियमितपणे तोंडाची सफाई करा.

Leave a Comment